शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

हौसेसाठी ‘ तो ’ बाळगत होता पिस्तुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:00 IST

घराशेजारी राहायला आलेल्या एका बिहारी तरुणाकडून त्याने सहा महिन्यांपूर्वी ते विकत घेतले होते़. केवळ हौस म्हणून तो ते मिरवत होता़.

ठळक मुद्दे२५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त

पुणे : तो २५ वर्षाचा तरुण, शिक्षण अर्धवट सोडलेले, सध्या काहीही कामधंदा करत नाही, आईवडिल मोलमजुरी करणारे, त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा नाही की कोणाची भांडण नाही़. लहानपणापासून पुण्यात राहणाऱ्या या युवकाच्या शेजारी एक बिहारी तरुण राहिला.  त्याच्याकडील हत्यार पाहून त्याने ते विकत घेतले़ आणि आता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला़. केवळ हौस म्हणून तो गेल्या सहा महिन्यांपासून गावठी पिस्तुल बाळगत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे़. अभिषेक दीपक दीक्षित (वय २५, रा़ जनता वसाहत, पर्वती) असे त्याचे नाव असून दत्तवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस नाईक सुधीर घोटकुले यांना पर्वती दर्शन येथील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील जय भवानी हॉटेलसमोर एक तरुण गावठी पिस्तुल घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली़ . या माहितीनुसार दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले़. त्याकडे २५ हजार रुपयांचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आले़. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्या घराशेजारी राहायला आलेल्या एका बिहारी तरुणाकडून त्याने सहा महिन्यांपूर्वी ते विकत घेतले होते़. केवळ हौस म्हणून तो ते मिरवत होता़. अभिषेक दीक्षित याच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे नसल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डफळ तसेच पोलीस कर्मचारी तानाजी निकम, रवींद्र फुलपगारे, सुधीर घोटकुळे आदिंनी ही कामगिरी केली़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस