शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर पिस्तूल रोखून पळणारा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 21:17 IST

त्याने कमरेचे पिस्तुल काढून पोलिसांवर रोखले व मी भाई आहे इथला़ मला पकडणारा जन्माला यायचाय असे म्हणून कोणी पुढे य्याल तर मी फायर करीन....

ठळक मुद्देसेव्हन लव्ह चौकात घडला थरार : एकास अटकगावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त

पुणे : गावठी पिस्तुल बाळगणाऱ्याविषयी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला़. पण, त्या अगोदरच ते त्याच्या लक्षात आले़ तेव्हा त्याने पोलिसांवर पिस्तुल रोखून पुढे याल तर फायर करेन,अशी धमकी दिली़. ते पाहून भर चौकात एकच गोंधळ उडाला़. अनेक वाहनचालकांनी आपली वाहने जागेवरच सोडून पळ काढला़. शेवटी पोलिसांनी पाठलाग करुन त्याला जेरबंद केले़. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता सेव्हन लव्ह चौकात घडली़ .आकाश कुमार शेटे (वय २०, रा़ शुक्रवार पेठ) असे त्याचे नाव आहे़. त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़. खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी राकेश क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, पंढरपूरला वारीला गेलेला परत येत असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल आहे़. या माहितीवरुन पोलिसांनी लव्ह लव्हज चौकात रात्री सापळा रचला़ मिळालेल्या माहितीप्रमाणे एक जण हॉटेल चंदनसमोर येताच पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरुन पकडण्याचा प्रयत्न केला़. तेव्हा त्याने कमरेचे पिस्तुल काढून पोलिसांवर रोखले व मी भाई आहे इथला़ मला पकडणारा जन्माला यायचाय असे म्हणून कोणी पुढे य्याल तर मी फायर करीन असे सांगत तो चौकातून हातात पिस्तुल धरुन पळू लागला़. त्याला पाहून चौकातील काही जणांनी जागेवरच वाहने टाकून पळ काढला़. हातगाडीवाले हातगाडी सोडून पळून गेले़. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुुरु केला़. नेहरु रोडवरील बँक आॅफ महाराष्ट्र समोर शेवटी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले़. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी तसेच विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, कर्मचारी शाम लोहोमकर, राकेश क्षीरसागर, समीर माळवदकर, संदीप कांबळे यांनी ही कारवाई केली़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक