शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या दिराने ठेवायला दिलेले पिस्तुल बाळगणे पडले महागात; पोलिसांच्या जाळ्यात अडकला तरुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:01 IST

गुन्हे शाखेच्या युनिट १ ने तरुणाकडून जप्त केली २ पिस्तुले

पुणे : तो बांधकाम व्यवसायात काम करुन सर्वसामान्य जीवन जगत होता. त्याच्या बहिणीच्या दिराने एके दिवशी त्याच्याकडे पिस्तुले ठेवण्यासाठी दिली. दरम्यान, बहिणीच्या दिराला पोलिसांनी पकडल्याने हा तरुण घाबरला. आपल्यालाही पोलीस पकडतील, असे त्याला वाटले. बहिणीचा दीर जामिनावर सुटल्यानंतर त्याचे त्याला पिस्तुले परत देण्यासाठी या तरुणाला त्याने अप्पर इंदिरानगर येथे बोलावले. ही माहिती पोलिसांना समजली. पिस्तुल घेऊन आलेल्या या तरुणाला पोलिसांनी सापळा लावून पकडले.रमेश नरसिंग राठोड (वय ३०, रा. मंजाळकर चौक, वडारवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार यांना अप्पर इंदिरानगर येथे एक जण पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अप्पर इंदिरानगर येथील पीएमपीएल आवारात बुधवारी रात्री सापळा रचला. तेथे संशयित तरुण आला असताना पोलिसांनी त्याला पकडले. रमेश राठोड याच्याकडील पिशवीमध्ये २ गावठी पिस्तुल व २ जिवंत काडतुसे असा १ लाख २२ हजार रुपयांचा माल मिळाला. राठोड याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो बांधकाम व्यावसायात काम करत होता. लॉकडाऊनमध्ये त्याचे काम थांबले होते. त्याच्या बहिणीचा दीर रोहित उर्फ गोपाळ गवळी (रा. दांडेकर पुल) याने त्याच्याकडे ही पिस्तुले ठेवण्यासाठी दिली होती. त्याला काही दिवसांपूर्वी दत्तवाडी पोलिसांनी त्याला पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. रोहित गवळी हा सोमवारी जामिनावर सुटल्यानंतर त्याने रमेशला पिस्तुल परत देण्यासाठी बोलावले होते. रोहित गवळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर लॉकडाऊनमध्येही पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल आहे.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात आय्याज दड्डीकर, योगेश जगताप, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, सतीश भालेकर यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटक