पिंपरीमध्ये 'आयटी' तरुणीची अज्ञातांकडून हत्या
By Admin | Updated: December 25, 2016 09:21 IST2016-12-25T08:33:14+5:302016-12-25T09:21:04+5:30
पिंपरीजवळ आकुर्डीत राहणाऱ्या एका तरुणीची दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी चाकूनं भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस

पिंपरीमध्ये 'आयटी' तरुणीची अज्ञातांकडून हत्या
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 25 - पिंपरीजवळ आकुर्डीत राहणाऱ्या एका तरुणीची दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी चाकूनं भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री ही घटना घडली. अंतरा दास असं या तरुणीचं नाव असून ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती.24 वर्षीय अंतरा ही मूळ पश्चिम बंगालची रहिवासी होती.
देहूरोड पोलीस ठाण्याअंतर्गत काल रात्री दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी तिची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केली. हत्या करून हल्लेखोरांनी पळ काढला.
काही दिवसांपासून काही तरूण अंतराला त्रास देत होते अशी माहिती आहे. याप्रकरणी अंतराच्या वडिलांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.