शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबाद येथील मराठी साहित्य संमेलनात पायरेटेड पुस्तके आढळल्याने उडाला गोंधळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 13:58 IST

साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर आढळली पायरेटेड पुस्तके

ठळक मुद्दे'आमचा बाप आणि आम्ही' आणि 'कोल्हाट्याचे पोर' ही पायरेटेड पुस्तके संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होण्या अगोदरच येण्या त्या प्रकाराने गाजत आहे. कधी साहित्य संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीवरुन तर कधी संमेलन उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक ना.धो.महानोर यांना कार्यक्रमाला न जाण्याची आलेली धमकी. सातत्याने अशा घटनांनी उस्मानाबाद येथील साहित्य संमेलन चर्चेत आहे. त्यात भर म्हणून शुक्रवारी साहित्य संमेलनात कचोरी आणि वडापाव स्टॉलवर पायरेटेड पुस्तके आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हिंगलासपूरकर नाश्ता करण्यासाठी बाहेर पडले असता, कचोरीच्या स्टॉलच्या बाजूला पायरेटेड पुस्तकांची विक्री सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ते म्हणाले, 'अजून ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन झालेले नाही. त्याआधीच कचोरी आणि वडा पावच्या स्टॉलच्या बाजूला 'आमचा बाप आणि आम्ही' आणि 'कोल्हाट्याचे पोर' ही पायरेटेड पुस्तके आढळून आली. याबरोबरच अनेक नामवंत लेखकांची पुस्तके येथे उपलब्ध होती. 'कोल्हाट्याचे पोर'ची छापील किंमत 125 रुपये आहे. मात्र, पायरेटेड पुस्तक 150 रुपयांना विकले जात होते. 'आमचा बाप आणि आम्ही' ही छापील किंमत 150 रुपये असून, पायरेटेड पुस्तकावर २५० रुपये किंमत टाकण्यात आली आहे.'हा चोरीचा प्रकार असून, मराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे ८ विक्रेते आहेत. अनेक जुन्या पुस्तकांना वाचकांकडून आजही चांगली मागणी आहे. 'बलुतं' या पुस्तकाला 40 वषार्नंतरही मागणी आहे. याचा फायदा घेऊन हे पायरसीचे प्रकार घडत आहेत. संमेलनातच असे प्रकार होणे पूर्ण चुकीचे आहे. आम्ही प्रकाशक संमेलनात आधीच पुस्तकांवर सवलत जाहीर करत असतो. गैरव्यवहार करणारे विक्रेते जास्त किंमत लावून वाचकांची फसवणूक करत आहेत. पायरसी हा गुन्हा आहे. सरकारने कडक कायदा करून बंदी आणावी. कारण, अशी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढणे घातक आहे. आम्ही संयोजकांकडे तक्रार केली आहे, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.ही पुस्तके मी रद्दीतून विकत घेतली, असे विक्रेत्याने सांगितले. मात्र, अशी नवीकोरी पुस्तके रद्दीत कशी विकली जातील, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संयोजकांकडे तक्रार केल्यानंतर पुस्तके जप्त करून संबंधित विक्रेत्यास बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनliteratureसाहित्यfraudधोकेबाजी