पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांची बेशिस्त वागणूक, दोन दिवसांत तब्बल ६२७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 02:30 PM2021-04-26T14:30:24+5:302021-04-26T14:31:07+5:30

शनिवारी ३४० व रविवारी २८७ जणांवर कारवाई

In Pimpri-Weekend Lockdown, 627 people were treated in two days | पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांची बेशिस्त वागणूक, दोन दिवसांत तब्बल ६२७ जणांवर कारवाई

पिंपरीत विकेंड लॉकडाऊनमध्येही नागरिकांची बेशिस्त वागणूक, दोन दिवसांत तब्बल ६२७ जणांवर कारवाई

Next
ठळक मुद्देशहरात नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच विनामास्क फिरणारे सर्वाधिक

पिंपरी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र तरीही काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. अशा प्रकारे विनामास्क फिरणा-या ६२७ जणांवर विकेंड लॉकडाऊनमध्ये शनिवारी (दि. २४) व रविवारी (दि. २५) कारवाई करण्यात आली.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. तर शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन आहे.  त्यामध्येही बेशिस्त नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यातील अनेक जण मास्कचा वापर करत नाहीत. अशा विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कारवाई केली. यात शनिवारी ३४० व रविवारी २८७ जणांवर कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी केलेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (५४), भोसरी (१७), पिंपरी (७४), चिंचवड (५८), निगडी (४०), आळंदी (३०), चाकण (३७), दिघी (१६), सांगवी (२९), वाकड (२५), हिंजवडी (१२६), देहूरोड (०२), तळेगाव दाभाडे (२६), तळेगाव एमआयडीसी (०३) चिखली (१५), रावेत चौकी (१८), शिरगाव चौकी (३९). 

Web Title: In Pimpri-Weekend Lockdown, 627 people were treated in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.