शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीच्या याचिकेवर नियामक आयोग, महावितरणकडून ग्राहक अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:13 IST

महावितरणने नोव्हेंबर २०२४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या बहुवार्षिक वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता.

पुणे : महावितरणच्या दरवाढ प्रस्तावाला फेटाळल्यानंतर त्याच आदेशाला राज्य वीज नियामक आयोगाने स्थगिती दिली. मात्र, आता त्याच निर्णयाबाबत महावितरणने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेबाबत महावितरणने ग्राहकांना अंधारात ठेवले असले तरी आयोगानेही सुनावणी घेऊन केवळ निर्णय देणे शिल्लक ठेवले आहे. या निर्णयातून पुन्हा दरवाढ सोसावी लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातून आयोगाचा कारभार किती अपारदर्शक आणि ग्राहकविरोधी आहे, हेच यातून सिद्ध होते, असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.महावितरणने नोव्हेंबर २०२४ मध्ये पुढील पाच वर्षांसाठीच्या बहुवार्षिक वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता. त्यावर आयोगाने राज्यभरातील ग्राहकांना म्हणणे मांडण्यासाठी चार महिन्यांची संधी दिली. त्यानंतर २८ मार्चला ८२७ पानी आदेश दिला. त्यात आयोगाने महावितरणचा ४८ हजार ६६ कोटींचा तुटीचा प्रस्ताव फेटाळला, तसेच महावितरणकडे ४४ हजार ४८० कोटी रुपये जास्तीचे शिल्लक राहणार असल्याचे दाखवून २०२५-२६ मध्ये १० टक्के वीजदरकपात करण्याचा निर्णय दिला. तर २०२९-३० पर्यंत दरकपात १६ टक्क्यांपर्यंत करण्याचे आदेश दिले. यामध्ये आयोगाने २०२५-२६ मध्ये सर्व प्रकारांतील दर ५ ते १५ टक्क्यांनी कमी केले.मात्र, या वीजदर कपातीमुळे महावितरण दिवाळखोरीत निघेल, अशी हाकाटी सुरू करण्यात आली. त्यानंतर आयोगाने लगेचच आपणच दिलेल्या वीजदर कपातीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर महावितरणने एप्रिलअखेर गाजावाजा न करता पुनर्विचार याचिका आयोगाकडे सादर केली. या याचिकेत नेमके काय म्हणणे मांडले आहे, ते संकेतस्थळावर टाकण्याची तसदी महावितरणने घेतली नाही. त्याचप्रमाणे नियमांनुसार आयोगानेही या याचिकेबाबत जाहीर केले नाही. तसेच या याचिकेवर फक्त महावितरणचे म्हणणे ऐकून घेऊन ग्राहकांना या प्रस्तावाबाबतच पूर्ण अंधारात ठेवून त्यावरील निर्णय आयोग लवकरच देणार आहे. यातून आयोगाचा कारभार अपारदर्शक आणि ग्राहकविरोधी आहे हेच यातून सिद्ध होते असा आरोप ग्राहक संघटनांनी केला आहे.

आता एकदाचा वीज नियामक आयोग महावितरणमध्ये विलीन करून टाकावा. म्हणजे निकाल देण्याची ढोंगबाजी करण्याची गरज उरणार नाही. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरण