शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पिंपरी महापालिकेच्या विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:22 IST

- १८ हजार ५०० हरकती प्राप्त : हरकती घेण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या नवीन सुधारित प्रारूप विकास आराखड्यावर (डीपी) विविध भागांतून हरकतींचा पाऊस पडला आहे. आत्तापर्यंत १८ हजार ५०० हरकती नागरिकांनी घेतल्या आहेत. हरकती घेण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत असून, सार्वजनिक सुट्या वगळून सहाच दिवस उरले आहेत. हा आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून विविध आंदोलने सुरू असून, विधिमंडळातही त्यावर चर्चा झाली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील २०४१ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून महापालिकेच्या क्षेत्रासह पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून वर्ग करण्यात आलेल्या क्षेत्राचा एकत्रित प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला. गुजरातमधील ‘एचसीपी’ या संस्थेने तयार केलेला आराखडा १४ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील २८ गावांच्या एकूण १७३.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या आराखड्यात शहरातील विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक सेवा व सुविधांसह नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. केंद्र, संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी यांनी ‘रेड झोन’चा अचूक नकाशा प्रसिद्ध केलेला नसताना महापालिकेने 'रेड झोन'ची सीमा स्पष्ट करीत अनेक आरक्षणे प्रस्तावित केली आहेत.बांधकाम परवानगी दिलेल्या ठिकाणीही आरक्षणे...बांधकाम परवानगी दिलेल्या ठिकाणीही आरक्षणे टाकली आहेत. या आरक्षणांना आक्षेप घेत आत्तापर्यंत १८ हजार ५०० हरकती महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक हरकती या चिखली, एचसीएमटीआर (रिंगरोड) मार्गिका, मोशीतील कत्तलखाना, थेरगाव, वाल्हेकरवाडी, रहाटणी भागातील प्रस्तावित रस्ते, मोठे प्रकल्प, व्यापारी संकुल, हरित क्षेत्र कमी करणे आदींसाठी आहेत. काही ठिकाणी गरज नसताना परस्पर आरक्षण टाकले आहे. शेती आणि औद्योगिक क्षेत्रातही आरक्षणे टाकण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. या आराखड्याला सत्ताधारी पक्षाच्या शहरातील तीन आमदारांनी विरोध केला असून, त्यावर विधिमंडळातही चर्चा झाली आहे.हरकती नाेंदविण्यासाठी उरले सहा दिवसआराखड्याबाबत लेखी स्वरूपात सूचना व हरकतीसाठी ६० दिवसांची म्हणजे १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील आयुक्त कक्ष, तळमजल्यावरील नगररचना विभागात आणि खराळवाडीतील विशेष नियोजन प्राधिकरण कार्यालयात हरकती स्वीकारल्या जात आहेत. हरकती घेण्यासाठी शनिवार आणि रविवारच्या सुट्या वगळून अवघे सहा दिवस राहिले आहेत.सुनावणीसाठी पाच सदस्यांची समितीहरकतींवर सुनावणी घेण्यासाठी सात सदस्यांच्या नियाेजन समितीची नियुक्ती करण्यात येते. यामध्ये चार तज्ज्ञ मंडळी, महापालिका आयुक्त आणि दोन नगरसेवकांचा समावेश केला जातो. यावेळी नगरसेवक नसल्याने आयुक्तच तीन सदस्यांचे कामकाज पाहणार आहे. त्यामुळे पाच सदस्यांची समिती असणार आहे. हरकती व सूचना याेग्य की अयाेग्य याची तपासणी ही समिती करणार आहे. यासाठी समितीला दाेन महिन्यांचा वेळ असणार आहे. याेग्य हरकतींची दखल घेऊन त्यामध्ये काही बदल हाेऊ शकताे.

पाच सदस्यांची समिती हरकतींवर सुनावणी घेईल. त्यानंतर आराखडा राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.- प्रसाद गायकवाड, उपसंचालक, महापालिका 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड