पवनानगर - मळवंडी ठुले धरण परिसरातील तिकोणा गावाच्या हद्दीत काल (दि. २९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एकाचा पाय घसरून मृत्यू झाला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकोणा गावच्या हद्दीतील एका बंगल्यावर गवंडी काम करणारे वडील, मुलगा आणि आणखी एक मजूर सायंकाळी काम आटोपून मळवंडी ठुले धरणावर हातपाय धुण्यासाठी गेले होते.त्यावेळी सोहम अनिल पवार (वय १५ वर्षे, रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) हा धरणात उतरला होता. मात्र, त्याचा पाय घसरल्याने तो धरणातील गाळात गेला. यावेळी इतर दोघांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेत सोहम अनिल पवार (वय १५ वर्षे, रा. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे) यांचा मृत्यू झाला असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ चपटे, प्रशांत तुरे आणि भिमा वांळुज हे करत आहेत.
Web Summary : A 15-year-old boy drowned in Maval's Malavandi Thule Dam after slipping while washing his hands. He was with his father and another worker after finishing construction work. Despite rescue attempts, he died at the scene. Police are investigating.
Web Summary : मावल के मालवंडी ठुले बांध में हाथ धोते समय फिसलने से 15 वर्षीय लड़के की डूबने से मौत हो गई। वह निर्माण कार्य खत्म करने के बाद अपने पिता और एक अन्य मजदूर के साथ था। बचाव प्रयासों के बावजूद, उसकी मौके पर ही मौत हो गई। पुलिस जांच कर रही है।