शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

अंधाराचा फायदा घेत 'उजनी'मध्ये बेसुमार वाळूउपसा; कालठण ते कांदलगाव हा पट्टा केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:23 IST

- फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटीद्वारे उपसा, नावे समजूनही गुन्हे दाखल न होण्याचे गौडबंगाल

- शैलेश काटे

इंदापूर : उजनी पाणलोट क्षेत्रात बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. कालठण ते कांदलगाव हा पट्टा बेकायदा वाळू उपशाचे केंद्रबिंदू ठरला आहे. दररोज किमान ५० फायबर बोटी व तेवढ्याच सक्शन बोटींच्या साहाय्याने रात्रीच्या वेळी वाळू उपसा केला जातो. हजारो रुपयांचा व्यवहार पार पडतो. महसूल व पोलिस यंत्रणा मात्र बेवारस बोटी फोडण्याची कारवाई करते. शासनदरबारी त्याची नोंद होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वाळू चोरांची नावे नोंदवल्याचे दिसत नाही.इंदापूर तालुक्याला भिगवण ते तरटगाव असा ३५ किलोमीटर अंतराचा उजनी धरण पाणलोट क्षेत्राचा प्रदीर्घ पट्टा लाभलेला आहे. भीमा नदीची वाळू कसदार व बांधकामासाठी चांगल्या दर्जाची समजली जाते. त्यामुळे तिला चांगली मागणी आहे. शासनाच्या अनास्थेमुळे नदी स्वच्छ होत नाही. त्यामुळे उजनी धरण व भीमेच्या पात्रात भरपूर गाळ व त्याच प्रमाणात वाळूसाठा लपलेला आहे. हे काळे कसदार सोने चोरणाऱ्यांच्या मोठमोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. स्थानिक टोळ्यांना परजिल्ह्यातील टोळ्यांची कुमक मिळाली आहे.सध्या कांदलगाव, महादेवनगर, शहा, माळवाडी, अजोती, सुगाव, गंगावळण, शिरसोडी, पडस्थळ, कालठण गावांच्या हद्दीतील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. दररोज सायंकाळी पाचवाजल्यानंतर किमान ५० फायबर व तेवढ्याच सक्शन बोटींद्वारे वाळू उपसा सुरू होतो. प्रत्येक गावामधून असंख्य ट्रक भरून वाळू उचलली जाते. सध्या वाळू उपसा करणाऱ्यांनी शहा गाव व त्याभोवतीचा परिसर यावर लक्ष केंद्रित केले आहे. वाळू चोरांना हा परिसर, काढलेल्या वाळूचा साठा करून ठेवण्यासाठी सुरक्षित व वाहतुकीसाठी सोपा वाटतो. याखेरीज या गावामधील कथित प्रतिष्ठितांचे हातही या वाळूच्या धंद्यात गुंतले आहेत.वाळू उपशावर महसूल व पोलिस यंत्रणेची कारवाई हा एक विनोदाचा भाग होऊन बसला आहे. जेवढ्या प्रमाणात वाळू उपशासाठी बोटींचा वापर केला जातो त्याच्या एक टक्काही बोटी महसूल व पोलिस यंत्रणेच्या पथकास सापडत नाहीत. पाठलाग करून पकडलेल्या बोटी नंतर कशा बेवारस ठरतात. त्यामध्ये वाळू कशी काय नसते. त्या बोटी कोणाच्या असतात, त्यांची नाते का पुढे येत नाहीत. गुन्हे का दाखल होत नाहीत, हे गौडबंगाल कधीच कळत नाही.वाळू चोरांची स्थानिक मच्छिमारांवर दादागिरीपाणलोट क्षेत्रात मासेमारी हा आणखी एक मोठा व्यवसाय आहे. रीतसर चालणारा हा व्यवसाय वाळू उपशामुळे संकटात सापडला आहे. मासेमारीसाठी वापरात येणारी जाळी वाळू उपसा करणाऱ्या बोटी व इंजिनच्या पाठीमागे लावलेल्या पंख्यामुळे तुटतात.मासे सापडणे जिकिरीचे होते. मस्तवाल वाळूचोरांना जाब विचारणे म्हणजे आपला जीव संकटात टाकणे हे मच्छिमारांना माहिती आहे. त्यांची दहशत व दादागिरीस सामोरे जाण्यापेक्षा गप्प बसणे सोयीचे अशी भूमिका मच्छिमारांना घ्यावी लागत आहे.चोरीनंतर शासकीय यंत्रणा सज्जप्रशासकीय यंत्रणेतील अनेक जणांचे वाळू चोरांशी संबंध आहेत. वाळू चोरांच्या अदृश्य साथीदारांनी अगदी तहसीलदारांच्या निवासस्थानापासून ते पोलिस वसाहतीतील 'त्या' विशिष्ट खोलीपर्यंत पाळत ठेवलेली असते. कर्तव्यावर 'अर्थ'पूर्ण हात फिरला की चोर चोरी करायला मोकळे असतात. चोरी झाल्यानंतर कर्तव्य पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज होत असते, असा प्रकार इकडे घडतो. तो जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वाळूच्या धंद्याला मरण नाही, असे अवैध वाळू व्यावसायिक छातीठोकपणे सांगत असतात.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड