शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad Corona Breaking: रुग्णसंख्या वाढल्याने पिंपरी-चिंचवड पुन्हा 'रेडझोन'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 13:52 IST

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने शहराचा समावेश केला रेस झोनमध्ये

ठळक मुद्देउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना दिली माहिती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश केला आहे, नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण सापडले. तर ती बंद करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  

पिंपरी-चिंचवड शहरात आठ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मार्च, एप्रिल, मे महिन्यात शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. दिनांक २२ मे पूर्वी शहरात २६५ रुग्ण होते त्यामुळे राज्य सरकारने २२ मे रोजी शहराला रेडझोनमधून वगळले होते. जुन, जुलै महिन्यात रूग्णाची संख्या वाढत आहे.आॅगस्टच्या पहिल्या दिवसापासून दिवसाला एक हजारहून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. रुग्णसंख्या २५  हजार ४९५ झाली आहे.  वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश राज्य सरकारने शहराचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आयुक्तांना शासन निर्णयाची माहिती दिली. त्यामुळे शहर आता पुन्हा रेडझोन असणार आहेत.

  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे शहर रेडझोनमध्ये समाविष्ट झाले आहे. आपले शहर रेडझोनमध्ये असणे ही बाब चांगली नाही. आपले शहर हे औद्योगिकनगरी आहे. ज्या कंपनीत, दुकानामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण सापडतात. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या सापडल्यास आस्थापना काही कालावधीसाठी बंद केल्या जातील. नियमांत फारशे बदल होणार नाहीत.’’

नागरिकांना दक्षतेचे आवाहनआयुक्त म्हणाले, ‘‘शहरातील काही कंपन्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडले होते. त्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या होत्या. पण, ज्या आस्थापनांमध्ये एखादा रुग्ण सापडल्यास त्यांचे ट्रेसिंग करुन तपासणी करतो. रुग्णसंख्येनुसार कंपनी परिसर निर्जुंतीकरण पुन्हा चालू केली जाते.  नागरिकांनी बाहेर पडताना सुरक्षित अंतराचे पालन करावे. कायम मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टंसिंगकडे आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारMIDCएमआयडीसी