पिंपरी :पुणे -मुंबई महामार्गावर दापोडी येथे एका कारने पेट घेतला. आगीत कार पूर्णपणे खाक झाली. ही घटना सोमवारी (दि. ७) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी येथे मेट्रो स्टेशनजवळ ग्रेड सेपरेटरमध्ये एका कारमधून अचानक धूर येत होता. ही बाब लक्षात येताच कारमधील प्रवासी कारमधून बाहेर पडले. त्यानंतर कारने पेट घेतला. आगीत कार जळून खाक झाली. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला.
अग्निशामकच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. तसेच वाहनांचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. आगीचे कारण समजू शकलेले नाही.