पिंपरखेड ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:16+5:302021-01-08T04:31:16+5:30
वार्ड क्रमांक १ मधून . शरद सुरेश बर्डे, सीमा संग्राम पोखरकर, स्वाती शेखर बो-हाडे वार्ड क्रमांक २ मधून ...

पिंपरखेड ग्रामपंचायत बिनविरोध
वार्ड क्रमांक १ मधून . शरद सुरेश बर्डे, सीमा संग्राम पोखरकर, स्वाती शेखर बो-हाडे
वार्ड क्रमांक २ मधून राजेश विठ्ठल दाभाडे, युवराज किसन गावशेते, ज्योती सचिन बोंबे
वार्ड क्रमांक ३ मधून विकास देवराम वरे, नीलम संतोष वरे
वार्ड क्रमांक ४ मधून. बळवंत सीताराम बोंबे, शीतल रंगनाथ शेळके, संगीता कारभारी बो-हाडे.
कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी कवठे येमाई येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना ग्रामपंचायत करण्याचे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद देत आमदाबाद पाठोपाठ पिंपरखेड गावच्या ग्रामस्थांनीही गावच्या विकासासाठी मतभेद विसरून जात ग्रामपंचायत निवडणूक अखेरच्या क्षणी केल्यामुळे टाकळी हाजी कवठे यमाई जिल्हा परिषद गटात दोन ग्रामपंचायती झाले आहेत. जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे व घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक राजेंद्र गावडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्हा परिषदमधून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न करू, असे जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे यांनी सांगितले.
माजी सरपंच राजेंद्र दाभाडे म्हणाले की, अनेक जण सदस्य होण्यासाठी इच्छुक असतानासुद्धा त्यांनी गावच्या विकासासाठी मनाचा मोठेपणा दाखवत माघारी घेतल्यामुळे ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांना बिनविरोध करण्यात यश आले असून यापुढे गावच्या विकासाला एकजुटीमुळे चालना मिळणार आहे.
: पिंपरखेड ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करताना जिल्हा परिषद सदस्य सुनीता गावडे, राजेंद्र गावडे व ग्रामस्थ.