शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

करदात्यांनी महापालिकेला लावला दहा कोटींचा चुना;तब्बल ७८० धनादेश बाउन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:17 IST

- प्रशासनाकडून मालमत्ता जप्तीचे फक्त इशारेच; मालमत्ता जप्तीची धमकी देत कर्मचाऱ्यांनी वसुलीपोटी घेतले होते धनादेश; थकबाकीधारकांनी बँक खात्यावर पैसे नसताना वेळ मारून नेली 

पिंपरी : नागरिकांनी मालमत्ता कर भरावा, यासाठी मार्चमध्ये महापालिकेने जोर लावला होता. त्यावेळी मालमत्ता जप्तीची धमकी देत कर्मचाऱ्यांनी वसुलीपोटी धनादेश घेतले होते. त्यातील १० कोटी १५ लाख रुपये रकमेचे ७८० धनादेश बाउन्स झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. धनादेश बाउन्स करणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिकेने फक्त नाेटीस देण्याची कारवाई केली आहे.शहरात निवासी, औद्याेगिक, व्यावसायिक, माेकळ्या जमिनी आणि मिश्र अशा ६ लाख ३२ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिका दरवर्षी कराची वसुली करत असते. अनेक मालमत्ताधारक ऑनलाइन, तर काहीजण धनादेशाद्वारे कर भरत असतात. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कर वसुलीसाठी जनजागृती, थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करणे, मालमत्ता जप्त करणे, नळजाेड खंडित करणे अशी मोहीम राबविण्यात आली. जास्तीत-जास्त वसुलीसाठी मार्च महिन्यात प्रयत्न झाले. त्यामुळे अनेक थकबाकीदारांनी मालमत्ता जप्त हाेऊ नये, यासाठी बँक खात्यावर पैसे नसताना महापालिकेला धनादेश दिले.

गतवर्षी एक हजार काेटींचे उद्दिष्ट असताना या विभागाने ९६६ काेटी रुपयांचे उत्पन्न कागदोपत्री मिळविले. मात्र, आता महापालिकेच्या १८ झाेनमध्ये तब्बल १० काेटी १५ लाख रुपयांचे ७८० धनादेश बाउन्स झाल्याचे समाेर आले आहे. धनादेश न वटण्याचा भुर्दंड बसून कागदोपत्री काम वाढते. शिवाय त्या थकबाकीदारांकडून करवसुलीला विलंब होतो. धनादेश बाउन्स हाेण्याची संख्या यापेक्षा जास्त होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यात धनादेश बाउन्स झालेल्यांशी महापालिकेने संपर्क साधून ऑनलाइन किंवा राेखीने कराचा भरणा करण्यास भाग पाडले. त्यामुळे काही अंशी धनादेश बाउन्सची संख्या कमी झाली. झोननुसार बाउन्स झालेल्या धनादेशांची संख्या

धनादेश बाउन्सची सर्वाधिक प्रकरणे थेरगाव झाेनमध्ये २३५ आहेत. शिवाय भाेसरी ९७, चिंचवड ८५, चिखली ६८, निगडी-प्राधिकरण २५, आकुर्डी १४, सांगवी २८, पिंपरी वाघेरे १६, पिंपरीनगर २६, महापालिका भवन २३, फुगेवाडी-दापाेडी १७, चऱ्हाेली १८, माेशी १८, तळवडे २९, किवळे १७, दिघी-बाेपखेल २६, वाकड १६, कस्पटे वस्ती २२ असे एकूण १० काेटी १५ लाखाची ७८० प्रकरणे आहेत. 

ज्या मालमत्ताधारकांचे धनादेश बाउन्स झाले आहेत, त्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांना पैसे भरण्यासाठी महिन्याची मुदत दिली आहे. त्यांच्याकडून पुन्हा धनादेश घेतला जाणार नसून ऑनलाइन किंवा राेखीनेच कराचा भरणा करून घेण्यात येणार आहे. मुदतीत भरणा न केल्यास मालमत्ता जप्त करून दिवाणी कारवाई करण्यात येईल.- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड