पायलट बलून निरीक्षक केंद्रे आता जीपीएसवर
By Admin | Updated: November 16, 2016 03:09 IST2016-11-16T03:09:44+5:302016-11-16T03:09:44+5:30
हवामानाची अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण माहिती मिळण्यासाठी देशातील ६० पायलट बलून निरीक्षक केंद्रे येत्या ६ महिन्यांत जीपीएसद्वारे

पायलट बलून निरीक्षक केंद्रे आता जीपीएसवर
पुणे : हवामानाची अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण माहिती मिळण्यासाठी देशातील ६० पायलट बलून निरीक्षक केंद्रे येत्या ६ महिन्यांत जीपीएसद्वारे चालविण्यात येणार असल्याचे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ़ डी़ प्रधान यांनी सांगितले़
हवामान विभागाच्या मौसम विज्ञान प्रशिक्षण संस्थेच्या वतीने उपकरण देखभाल आणि अंशाकन या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी झाले़, त्या वेळी ते बोलत होते़ या वेळी हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक बी़ मुख्योपाध्याय, सरफेस इन्स्ट्रूमेंट विभागाचे शास्त्रज्ञ आऱ आऱ माळी, शास्त्रज्ञ के़ एऩ मोहन, डॉ़ के़ व्ही़ पडगलवार आदी उपस्थित होते़
डॉ़ प्रधान म्हणाले, ‘‘गुणवत्तापूर्ण निरीक्षणे नोंदविलेल्या माहितीचा साठा अत्यंत महत्त्वाचा आहे़ (प्रतिनिधी)