पिफ ‘ऑनलाइन’ करण्याचा विचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:42+5:302021-01-08T04:26:42+5:30
नवीन वर्षात चित्रपट प्रेमींना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेध लागण्यास सुरुवात होते. पुणे फिल्म फौंंडेशनने गतवर्षीच १४ ते ...

पिफ ‘ऑनलाइन’ करण्याचा विचार सुरू
नवीन वर्षात चित्रपट प्रेमींना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेध लागण्यास सुरुवात होते. पुणे फिल्म फौंंडेशनने गतवर्षीच १४ ते २१ जानेवारी या पिफच्या तारख्या जाहीर केल्या आहेत. मात्र यंदा दोन्ही महोत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळेच दरवर्षी गोव्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात होणारा इफ्फी पुढे ढकलला. येत्या १६ जानेवारीपासून गोव्यात हा महोत्सव सुरू होत आहे. मात्र दोन्ही महोत्सवाच्या तारखा एकाच वेळी येत असल्याने आयोजकांना पिफ पुढे ढकलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या कालावधीत होणारा महोत्सव आता एक महिना पुढे ढकलला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, याबाबत पुणे फिल्म फौंडेशनने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. गतवर्षीच्या अंदाजपत्रकात पिफसाठी ४ कोटी रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. कोरोनामुळे शासनाने साहित्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानात कपात केली आहे. मग महोत्सवासाठीच्या निधीचे काय? आयोजकांना त्यातील किती निधी हातात पडणार? यातच चित्रपटप्रेमींना हा महोत्सव होणार? की नाही? महोत्सव ऑफलाईन कि ऑनलाइन होणार? याबाबत उत्सुकता लागलेली आहे.
----
इफ्फी आणि पिफ एकाच वेळेला येत आहेत. त्यामुळे काय करायंच? याचा विचार सुरू आहे. ऑनलाइनचा पर्यायही ठेवला आहे. दोन दिवसात पिफबाबत ठोस काहीतरी सांगू. - डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव