पिकअप-टेम्पोची समोरासमोर धडक, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:10 IST2021-04-09T04:10:43+5:302021-04-09T04:10:43+5:30

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी गावच्या हद्दीत असलेल्या सद्गुरुनगर या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट ...

Pickup-tempo head-on collision, a serious one | पिकअप-टेम्पोची समोरासमोर धडक, एक गंभीर

पिकअप-टेम्पोची समोरासमोर धडक, एक गंभीर

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी गावच्या हद्दीत असलेल्या सद्गुरुनगर या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्या ठिकाणी पुलाच्या बाजूने रस्ता काढण्यात आला आहे. त्या ठिकाणी धोकादायक वळण असल्यामुळे वाहनचालकास समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी वारंवार छोटेमोठे अपघात होत असतात. असाच अपघात गुरुवारी सकाळी झाला आहे. यामध्ये नारायणगाव बाजूकडून येणारी पिकअप जीप व आळेफाट्याकडून येणारा टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून त्यास उपचारासाठी एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या पिकअप चालकाचे नाव समजले नाही. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

Web Title: Pickup-tempo head-on collision, a serious one