शारीरिक शिक्षण संचालकच नाहीत
By Admin | Updated: December 13, 2014 23:02 IST2014-12-13T23:02:08+5:302014-12-13T23:02:08+5:30
पुणो,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये येत्या 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण योजना सक्तीची केली जाणार आहे.
शारीरिक शिक्षण संचालकच नाहीत
पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणो,अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये येत्या 2क्15-16 या शैक्षणिक वर्षापासून शारीरिक शिक्षण योजना सक्तीची केली जाणार आहे. परंतु, त्यासाठी महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण संचालकच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. 65क् महाविद्यालयांपैकी सध्या केवळ 179 महाविद्यालयांमध्येच मान्यता प्राप्त शारिरिक शिक्षण संचालक आहेत.
सर्व विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या (एफ.वाय.) विद्याथ्र्याना शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षण घ्यावे लागणार आहे. विद्याथ्र्याच्या गुणपत्रिकेवर या विषयाचे ग्रेड दिले जाणार आहेत. यासाठी सर्व महाविद्यालयांना विद्याथ्र्यासाठी खेळाचे मैदान आणि विविध प्रकारचे खेळाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्याच प्रमाणो ज्या महाविद्यालयात विद्याथ्र्याची संख्या अधिक आहे, अशा महाविद्यालयांना ट्रेनर्सची नियुक्ती करावी लागणार आहे. सध्या अभियांत्रिकी, औषधर्निमाणशास्त्र,व्यवस्थापनशास्त्र आदी महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षण संचालकाची नियुक्ती केली जात नाही. परतु, पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्वच विद्याशाखांच्या महाविद्यालयांना ही योजना राबवावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
4बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रीकेट, फुटबॉल, हॉकी, कब्बडी, खो-खो, मल्लखांब, स्वीमिंग, टेनिस, वॉलिबॉल, वेट लिफ्टिंग या खेळांसह इतरही खेळांच्या माध्यमातून महाविद्यालयांनी विविध उपक्रम राबविणो आवश्यक आहे. शारीरिक शिक्षण योजनेसाठी प्रत्येक विद्याथ्र्याकडून 2क् रुपये शुल्क आकारले जाईल. या योजनेंतर्गत महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालकांकडून विविध खेळांच्या माध्यमातून विद्याथ्र्याची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्याआधारे ग्रेड दिले जाणार आहेत. विद्याथ्र्याने कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा याबाबत मार्गदर्शन करून प्रत्येक विद्याथ्र्याचे ग्रेड कार्ड तयार केले जाणार आहे.