पडवी येथे लसीकरणावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:47+5:302021-07-05T04:07:47+5:30

वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे पडवी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना लसीकरणावेळी ना फिजिकल डिस्टन्सिंग, ...

Physical distance fuzz during vaccination at Padvi | पडवी येथे लसीकरणावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

पडवी येथे लसीकरणावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे पडवी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये

कोरोना लसीकरणावेळी ना फिजिकल डिस्टन्सिंग, नियोजन अभाव, ना शिस्त, अपुऱ्या लस, लांबच लांब रांगा, नियोजन होत नसल्याने ग्रामस्थ यांना त्रास सहन करावा लागत आहे.

लसी अपुऱ्या असल्याने अनेकांना लसी न घेता रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होत आहे. काही नागरिकांना ८४ दिवस झाले आहे. त्यांना या गोंधळामुळे लस मिळण्यासाठी अडचण येत आहे. या गोंधळामध्ये आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

या लसी करणावेळी सावळा गोंधळ दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नाही. यामुळे नागरिकांना मोकळ्या हाताने परत जावे लागले आहेत. या आरोग्य केंद्राचा नियोजन अभावामुळे नागरिकांना नाहक त्रास झाला आहे. याबाबत जिल्हा अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे रवींद्र शितोळे (ग्रामस्थ पडवी) यांनी सांगितले आहे.

पडवी येथे लसीकरणावेळी उडालेला गोंधळ.

Web Title: Physical distance fuzz during vaccination at Padvi