फुलराणीने बच्चे कंपनी खूष
By Admin | Updated: February 17, 2017 05:17 IST2017-02-17T05:17:32+5:302017-02-17T05:17:32+5:30
लहान मुलांना खेळण्यासाठी मोफत फुलराणी असावी अशी इच्छा होती. त्यामुळे स्वखर्चाने अनोखा उपक्रम राबविला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे

फुलराणीने बच्चे कंपनी खूष
सहकारनगर : लहान मुलांना खेळण्यासाठी मोफत फुलराणी असावी अशी इच्छा होती. त्यामुळे स्वखर्चाने अनोखा उपक्रम राबविला आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रुपेश तुरे यांनी सांगितले.
सहकारनगर पद्मावती या प्रभाग क्रमांक ३५ मध्ये निवडणूक लढवीत असलेले रुपेश तुरे यांनी फुलराणीला भेट देणाऱ्या बच्चे कंपनीची आणि त्यांच्या पालकांची तुरे यांनी भेट घेतली. हा उपक्रम पुढील पाच वर्षांसाठी मोफत सुरू ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.
घरगुती गाठीभेटींवर आपण भर देत असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे. महापालिकेचे प्रकल्प
बंद पडत असताना स्वखर्चाने फुलराणीचा उपक्रम राबविला. त्यामुळे नागरिक सुखावले असल्याचे तुरे यांनी सांगितले.
तुरे म्हणाले, की परिसरात तरुणांना रोजगार मिळावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. काही नेते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. तरुण व्यसनात अडकल्याने त्याचा त्रास पूर्ण कुटुंबाला
सहन करावा लागतो.
यासाठी पुढील काळात व्यसनमुक्तीसाठी काही विशेष उपक्रम राबविणार आहे.