७० हजार मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:09 IST2021-06-23T04:09:29+5:302021-06-23T04:09:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे कामे सध्या सुरू झाली असून, यामध्ये एकट्या वडगाव शेरी विधानसभा ...

Photographs of 70,000 voters are not in the voter list | ७० हजार मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत

७० हजार मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे कामे सध्या सुरू झाली असून, यामध्ये एकट्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील ७० हजार ७४१ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमध्ये नसल्याचे समोर आले आहे.

पुणे महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू झाले आहे. यात वडगाव शेरीमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या ४३० यादी भागातील ७० हजार ७४१ मतदारांची छायाचित्रे नसलेली यादी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी पुढील ७ दिवसांत रंगीत छायाचित्र रहिवाशी पुराव्यसह येरवडा क्षेत्रीय कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

------------

Web Title: Photographs of 70,000 voters are not in the voter list