शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

धक्कादायक! आरोपी दत्ता गाडेचा 'तो' फोटो आला समोर; स्वारगेट प्रकरणात नवीन खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:43 IST

Pune Crime News :  स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे

Pune Crime News ( Marathi News ) :  पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी दत्तात्रय गाडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आता या नराधमाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचे पोलिसांच्या वेषातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गाडे हा स्वारगेट पोलीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात स्वत: पोलीस असल्याचे भासवून तरुणींना फसवायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 

मुंडे, कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीत; विरोधकांनी केला मोठा आरोप

दत्तात्रय गाडे याचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर आला आहे, यामुळे आता गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याला गेल्या वर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांच्या वेषातील फोटो आढळला आहे. पोलीस भरतीबाबत आपण मार्गदर्शन करु शकतो, असं सांगत गाडे तरुणींच्या संपर्कात येत होता.  गाडे याने पोलिसांचा गणवेश कुठून आणला याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. त्याच्याविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे. 

दत्तात्रय गाडे हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरायचा. कधी एसटी कंडकस्टर आहे, तरी कधी पोलीस असल्याचे तरुणींना भासवायचा आणि फसवायचा अशी माहिती समोर आली आहे. 

पुणे, शिरूर, सोलापूर अनेक बस स्थानकात आरोपीचा मुक्त वावर

 स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल तपासातून आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. यामुळे आरोपीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी आरोपीची दोन वर्षांतली फोनची कुंडली काढली असून, त्यात त्याचा स्वारगेट बस स्थानकच नव्हे, तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बस स्थानक परिसरात मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. इतर बस स्थानकांच्या तुलनेत तो स्वारगेट बस स्थानकातच अधिक काळ वावरला असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा परिसर ही गर्दीची ठिकाणे त्याने हेरली होती. या परिसरात महिला आणि पुरुष प्रवाशांची सतत वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेऊन गाडे हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गाडेची कुंडली काढली असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :swargate bus depotस्वारगेट बसस्थानकCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे