पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:14 IST2021-08-14T04:14:56+5:302021-08-14T04:14:56+5:30
पुणे : पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित निर्णयानुसार आता २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ...

पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
पुणे : पीएच.डी. प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. सुधारित निर्णयानुसार आता २१ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहे. मागील काही दिवसांत राज्याच्या विविध विभागात पाऊस, अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जवळपासन दोन वर्षांने पीएच.डी. प्रवेश परीक्षा होत आहे. विद्यापीठाकडून यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. संशोधन केंद्र आणि रिक्त जागांची माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० जुलैची तर ऑनलाइन अर्ज करण्यास ८ ऑगस्टपर्यंत मुदत होती. ती आता २१ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. २२ ऑग्स्टला होणारी प्रवेश परीक्षा साधारण १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.