नारायणगाव परिसरात पेट्रोल चोर सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:11 IST2021-03-14T04:11:28+5:302021-03-14T04:11:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव : पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी मधील पेट्रोल चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली ...

Petrol thief active in Narayangaon area | नारायणगाव परिसरात पेट्रोल चोर सक्रिय

नारायणगाव परिसरात पेट्रोल चोर सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क

नारायणगाव : पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी मधील पेट्रोल चोरून नेणारी टोळी सक्रिय झाली आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील कांदळी हद्दीतील चौदानंबर येथे शनिवार (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोल चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. १४ नंबर येथील स्वामीनारायण सोसायटीमध्ये मध्यरात्री २ वाजता पार्किंगमध्ये असलेल्या तीन दुचाकीमधील पेट्रोल चोरी झाले आहे.

सोसायटीमधील नागरिक महेंद्र भोर, रवींद्र बाम्हणे, अरुण देशमुख आदींच्या दुचाकीतील पेट्रोलच्या टाक्यांची पेट्रोलची नळी कापून पेट्रोल चोरी करण्यात आली आहे. भोर, बाह्मणे, देशमुख सकाळी कामानिमित्त घराबाहेर जात असतांना ते मोटारसायकलजवळ गेले असतांना मोटारसायकलला असलेल्या पेट्रोलच्या नळ्या कापल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सोसायटी सदस्यांनी सीसीटीव्ही तपासले असता पेट्रोल चोरी करताना एक तरुण दिसला. त्याच्याबरोबर अन्य एक साथीदार असल्याचे समोर आले आहे. पेट्रोलचे दर एक लिटरला शंभर रूपयांच्या आसपास झाल्याने पेट्रोल चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

फोटो : चौदानंबर येथील स्वामीनारायण सोसायटी मध्ये दुचाकीमधील पेट्रोल चोरताना सीसीटीव्हित कैद झालेला चोरटा

Web Title: Petrol thief active in Narayangaon area