शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावर दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 18:36 IST

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या चार जणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले.

ठळक मुद्देपोलिसांची चाहूल लागताच तो डाळींब बाजूकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने फरार

लोणी काळभोर : शिंदवणे (ता. हवेली ) येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या चार जणांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले असून त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. या चोरांकडे कोयता, राऊंडसह गावठी पिस्तुल सापडले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समीर शब्बीर चमनशेख यांनी फिर्याद दिली आहे. शुभम ऊर्फ सोन्या कैलास कामठे (वय २३), अक्षय उत्तम कांबळे (वय २१, दोघे रा. मराठी प्राथमिक शाळेमागे, दमवाकवस्ती, ता. हवेली), प्रेम ऊर्फ प्रितम सुनील सुतार (वय २१, रा. बेंदवाडी, ता. हवेली), आकाश प्रकाश काकडे (वय २६, रा. ससाणेनगर, दुर्वांकुर सोसायटी, हडपसर) असे या चोरांची नावे असून ऋषिकेश पवार (रा. कदमवाकवस्ती) हा पाचवा चोर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. रविवारी (२० मे) रोजी पोलिसांना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलीस रेकॉर्डवरील फरार आरोपी शुभम कामठे हा आपल्या साथीदारांसमवेत दुचाकीवरून पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी सासवड येथून शिंदवणे घाट मार्गे येणार असल्याची पोलिसांना सूत्राकडून माहिती मिळताच ते सतर्क झाले. त्याचक्षणी पोलीस पथक त्वरीत वेशभूषा बदलून डाळींब गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून थांबले. या कारवाईत चार जणांना जागीच जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले. तर पाठीमागे काही अंतरावर ॠषिकेश पवार हा डिओ दुचाकी वरून येत होता. त्याला पोलिसांची चाहूल लागताच तो डाळींब बाजूकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने फरार झाला. यावरुन पोलिसांना हे सर्वजण पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी तयारीत असल्याची खात्री पटली. अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड व पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPetrol Pumpपेट्रोल पंपPoliceपोलिस