शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नको सांगणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण, रोख रक्कमही लुबाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 17:23 IST

पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नकोस असे सांगणाऱ्या एका कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम देखील हिसकावली.

ठळक मुद्देपंप पेटवून देण्याची धमकी देत १८ हजार ८१२ रुपये हिसकावले 

लोणी काळभोर : पेट्रोल पंपावर सिगारेट ओढू नकोस असे सांगितल्याच्या कारणावरून तिघा जणांनी पेट्रोल पंपावर काम करणा-या कर्मचा-याला लाथाबुक्यांनी मारहाण करत केली. तसेच  पेट्रोल पंप पेटवून देण्याची धमकी देत त्याच्याकडील १८ हजार ८१२ रुपये जबरदस्तीने हिसकावले. ही घटना बुधवारी (दि.११ एप्रिल) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.      यासंदर्भात पेट्रोल पंपावरील कामगार किरण नातू कुंजीर (रा. वळती, ता. हवेली) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सूरज गायकवाड (रा. ऊरूळी कांचन ), संदेश दिलीप कुंजीर (रा. वळती ) व एक अज्ञात तरूण या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कुंजीर हे लता बापूसाहेब जराड पाटील यांच्या मालकीच्या शिंदवणे येथील जय मल्हार पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल सोडण्याचे काम करतात. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी सूरज हा सिगारेट ओढत पंपावर आला. त्यावेळी त्याला किरण याने पंपाच्या आवारात सिगारेट ओढू नकोस असे सांगितले. याचा राग आल्याने सूरज याने कुंजीर यांना शिवीगाळ करत मी येथेच सिगारेट ओढणार, जास्त बोलू नकोस नाहीतर मी पंप पेटवून देईन अशी धमकी देत आपल्या दोन साथीदारांसह लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान,अनोळखी तरुणाने त्यांच्या खिशात हात घालून जमलेले पेट्रोल,डिझेलचे १८ हजार ८१२ रुपये जबरदस्तीने काढून घेतले. कुंजीर यांनी आरडाओरडा केल्याने पेट्रोल पंपासमोरच्या हॉटेल चालवत असलेला त्यांचा भाऊ मदतीला  येत असल्याचे पाहून तिघा आरोपींनी पळ काढला. पंपमालकांचा मुलगा युवराज जराड यांनी ऊरूळी कांचन दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrimeगुन्हाPoliceपोलिसPetrol Pumpपेट्रोल पंप