शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्धीसाठी फेकल्या आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोलच्या बाटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 13:25 IST

तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे...

पिंपरी: आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांच्या कार्यालयावर मंगळवारी पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या होत्या. दुपारी तीन वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे ही घडली. राहुल राम साळुंके (वय ३९, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तीन आरोपींपैकी दोघांना पिंपरी-चिंचवड शहरातून तर एकाला शहराच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी केवळ नाव कमावण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप अटकेची आणि इतर कायदेशीर प्रक्रिया शिल्लक असून मूळ उद्देशापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. अटक प्रक्रिया पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हजर करायचे आहे. त्यानंतर चौकशीत सर्व बाबी समोर येतील असे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करण्यात आली होती. शहरात काही ठिकाणी नाका बंदी देखील करण्यात आली होती.

सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ‘चंद्ररंग’ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे. काल दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरून तिघेजण आले, जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले. त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या आणि त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे