नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर याचिका
By Admin | Updated: November 9, 2016 02:44 IST2016-11-09T02:44:24+5:302016-11-09T02:44:24+5:30
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात येथील नगरसेवक संजय गायकवाड यांनी दाखल केली आहे

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणावर याचिका
लोणावळा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सर्वसाधारण महिला या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात येथील नगरसेवक संजय गायकवाड यांनी दाखल केली आहे. यावर न्यायालयात १७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोग व लोणावळा नगर परिषद यांच्या विरोधात गायकवाड यांनी उच्च न्यायालयातयाचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला सादर केलेल्या शपथपत्रात काही बदल करायचे असतील, तर त्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. मात्र, सध्याची निवडणूकप्रक्रिया ही थांबवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील आदेशावर संबंधित प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. १७ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.(वार्ताहर)