शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेंवरील गैरव्यवहाराचा आरोप गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 12:58 IST

गुंतवणूकदारांचा डीएसके यांच्याबद्दल गैरसमज झाल्याने त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे...

ठळक मुद्देप्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच : बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. शिवदे यांचा युक्तिवाद

पुणे : गुंतवणूकदारांचा डीएसके यांच्याबद्दल गैरसमज झाल्याने त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे. डीएसके यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांतून २१ लाखांचे ब्रॅण्डेड कपडे, ३९ हजारांचे बूट घेतले, २५ लाखांची घराची सजावट केली, १४ लाखांचे स्कर्ट आणि टॉप घेतल्याचे आरोप करण्यात आले आहेत. डीएसके यांच्यावर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केलेले पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोप हे गुंतवणूकदारांचे दिशाभूल करणारे असल्याचा युक्तिवाद डीएसके यांचे वकील श्रीकांत शिवदे यांनी बुधवारी सत्र न्यायाधीश जयंत राजे यांच्या न्यायालयात केला.   प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळे असून, अशाप्रकारे माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. सध्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना कुटुंबीयासह आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अ‍ॅड. शिवदे म्हणाले, गुंतवणूकदरांच्या पैशातून मुलांकरिता फुटबॉलचे मैदान उभारले़ प्रत्यक्षात खेळाडू यांच्याकरिता त्यांनी पुण्यातील एकमेव दर्जेदार फुटबॉल मैदानाची निर्मिती केली. डीएसके यांच्या सर्व कंपनी अधिकृत आणि नोंदणीकृत असून, त्यांनी वेळोवेळी आयकर विभागाला कर भरलेला आहे. त्यामुळे सरकारी वकील यांनी संबंधित कंपन्या या काल्पनिक असल्याचा व नोंदणीकृत नसल्याचा केलेला दावा चुकीचा आहे. डीएसके यांच्यावर कारवाई होण्यापूर्वी त्यांचा लोणावळा परिसरातील द्रुतगती महामार्गावर गंभीर अपघात झाला होता आणि त्यात त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला होता; तर ते स्वत: गंभीर जखमी झाले होते. पोलीस कोठडीत आजारी असताना त्यांनी वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली तेव्हा पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही...........

फॉरेन्सिक आॅडिटर असणे गरजेचे....आजारी असल्याने व ज्येष्ठत्वामुळे डीएसके यांनी झोपण्याकरिता बेडची केलेली मागणी मान्य केली नाही. त्यांना वेळोवेळी जामीन नाकारणे म्हणजे जिवंतपणी मरणातना दिल्यासारखे आहे. ४त्यांचा पासपोर्ट आधीच न्यायालयात पोलिसांनी जमा केलेला आहे़ त्यामुळे ते कुठे जाऊ शकत नाही. दोन वर्षांपासून आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील फॉरेन्सिक रिपोर्टची आमची मागणी प्रलंबित आहे. अशा प्रकरणात फॉरेन्सिक आॅडिटर असणे गरजेचे आहे; पण ती मागणी मान्य केली जात नसल्याचे शिवदे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीCourtन्यायालय