शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणाची जिद्द! कोरोनाच्या संचारबंदीत हमाली करून सांभाळले कुटुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 16:50 IST

तुळशीबागेत चालवतो टॉवेल, रुमाल यांचा स्टॉल

ठळक मुद्देसंकटात कधीही घाबरून अथवा नैराश्यात जाऊ नका, कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून हार न मानता जिद्दीने नव्या कामाला सुरुवात करा

पुणे: कोरोनाच्या काळात बेरोजगार झालेले तरुण, व्यवसाय डुबलेल्या अनेक व्यक्ती नैराश्यात जात होत्या. काही जण तर स्वतःच्या कुटुंबाचा विचारही न करता आत्महत्येचा मार्ग निवडू लागले होते. अशा कठीण काळात दोन महिने स्वतःचे दुकान बंद असल्याने हमालीचे काम करत कुटुंबाचा सांभाळ केला आहे. सगळं थांबल असतानाही शुभम गोरे याने धैर्य आणि जिद्दीने हे करून दाखवले आहे . पुण्यातील तुळशीबागेत शुभम गोरे याचा टॉवेल, नॅपकिन, हातरुमाल छोटा स्टॉल आहे.

पुण्यात तुळशीबाग मध्यवर्ती भागात येते. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी होत असते. ही चालू ठेवणे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे असते. कोव्हिडंच्या काळात येथील दुकाने वर्षभर बंद केली होती. काही महिने दुकानांना चालू करण्यास परवानगी देण्यात आली. पण पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्याने प्रशासनाने बंदी आणली. त्यामुळे येथील अनेक छोटे मोठे व्यापारी आणि व्यवसायिकांना आर्थिक चणचण भासू लागली. दुसरा कुठला व्यवसाय करावा असा प्रश्नही सर्वांसमोर उभा होता. शुभमलाही त्याची चिंता वाटू लागली होती. पण या कठीण काळात त्याने हार न मानता दुसरे काम शोधण्यास सुरुवात केली. शुभम म्हणाला, दोन महिन्यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात तुळशीबाग हे गर्दीचे ठिकाण असल्याने ते पहिल्यांदा बंद करण्यात आले. अशा वेळी पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच होती. माझ्या छोट्या स्टॉल वर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. म्हणून मी दुसऱ्या कामाचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

या परिस्थितीत मार्केटयार्ड चालू होते. मी मध्यरात्री अडीच, तीनच्या सुमारास तेथे जात असे. सकाळी सात वाजेपर्यंत हमालीचे काम करत होतो. त्यानंतर मिळालेल्या पैशातून टेम्पो भाडयाने घेत होतो. त्यामधून भाजी फळे घेऊन शहरात विक्रीसाठी येत असे. अशा प्रकारे दररोज काम करू लागलो. 

घरातली आई, वडील, दोन लहान भाऊ आणि आजी आजोबा यांची जबाबदारी माझ्यावर होती. वडिलांना दमा असल्याने ते शक्यतो अशा परिस्थितीत बाहेर पडत नव्हते. तो दोन महिन्याचा काळ खूपच वाईट गेला. पण काम करून आर्थिक चणचण दूर केली असल्याचे त्याने सांगितले. 

संकटात कधीही घाबरून अथवा नैराश्यात जाऊ नका

कोरोना काळात एक नवी शिकवण मिळाली. की एकाच व्यवसायावर कधीही अवलंबून राहू नये. तसेच कठीण काळात कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावी. नेहमी आपल्या कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून हार न मानता जिद्दीने नव्या कामाला सुरुवात करावी. असेही त्याने यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसायEmployeeकर्मचारी