पुणे मॅरेथॉनला अखेर परवानगी

By Admin | Updated: December 6, 2015 03:14 IST2015-12-06T03:14:49+5:302015-12-06T03:14:49+5:30

पोलिसांना असलेला ६ डिसेंबरचा बंदोबस्त आणि दोन वर्षांचे थकलेले बंदोबस्ताचे ३८ लाख रुपये या कारणांवरून रखडलेली पोलीस परवानगी शेवटी मॅरेथॉन स्पर्धेसाठी मिळाल्यामुळे आयोजकांनी

Permission for Pune Marathon finally | पुणे मॅरेथॉनला अखेर परवानगी

पुणे मॅरेथॉनला अखेर परवानगी

- बंदोबस्ताचे पैसे अद्याप नाहीच

पुणे : पोलिसांना असलेला ६ डिसेंबरचा बंदोबस्त आणि दोन वर्षांचे थकलेले बंदोबस्ताचे ३८ लाख रुपये या कारणांवरून रखडलेली पोलीस परवानगी शेवटी मॅरेथॉन स्पर्धेसाठी मिळाल्यामुळे आयोजकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. परंतु, मॅरेथॉन आयोजकांनी बंदोबस्ताचे पैसे अद्याप दिलेले नसून ते मिळावेत, याकरिता आयोजकांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठविणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी दिली.
६ डिसेंबरच्या दिवशी देशभरात हाय अ‍ॅलर्ट असल्यामुळे पोलिसांना कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागणार आहे. नेमकी याच दिवशी होत असलेली मॅरेथॉन पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी आयोजकांना केली होती. तसेच, मागील दोन वर्षांच्या बंदोबस्ताचे तब्बल ३८ लाख रुपये आयोजकांनी अद्याप दिलेले नसल्यामुळे पोलीस परवानगी देण्याबाबत उदासीन होते. परंतु, शनिवारी या
स्पर्धेला परवानगी देण्यात आली. मॅरेथॉन मार्गावर सर्वत्र शनिवारी संध्याकाळपासूनच वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडिंग करायला सुरुवात केली होती. तसेच स्थानिक पोलिसांनाही बंदोबस्ताच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Permission for Pune Marathon finally