ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने चालू करण्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:08 IST2021-06-10T04:08:41+5:302021-06-10T04:08:41+5:30

तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव सह बहुतांशी गावात ४ ते ५ नाभिक कुटुंब आहेत. कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी ...

Permission to open beauty parlor, salon shops | ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने चालू करण्यास परवानगी

ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने चालू करण्यास परवानगी

तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव सह बहुतांशी गावात ४ ते ५ नाभिक कुटुंब आहेत. कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी सलून व्यवसायासाठी गाळे भाड्याने घेऊन काम करत आहेत. परंतु सलून व्यवसायामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एक वर्षापासून सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद असल्यामुळे घरखर्च, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, लाईट बिल कसे भरायचे, यांसारखे असंख्य आर्थिक प्रश्नांना नाभिक समाजाला सामोरे जाताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी सलून व्यावसायिक चोरून लपून लोकांच्या घरी जाऊन दाढी, कटिंग करत होते. परंतु एक वर्षानंतरच्या प्रतीक्षेनंतर सलून दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिल्याने सोमवारी दुकानाची साफसफाई करून दुकाने सॅनिटाईज करून व्यवसाय पूर्ववत चालू केला आहे.

Web Title: Permission to open beauty parlor, salon shops