शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पुणे जिल्ह्यातील भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्या 12 विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 15:02 IST

फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश  

पुणे : जिल्ह्यातील ताडी विक्रेत्यांकडून ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळयुक्त ताडी विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ही भेसळयुक्त ताडी पिणाऱ्या लोकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील 12 भेसळयुक्त ताडी विक्री करणाऱ्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द केले.तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे जिल्हयाचे राज्य उतपादन शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली. 

याबाबत झगडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्हातील मंजूर ताडी विक्री करणा-यांकडून ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळ केलेल्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य उतपादन शुल्क विभागाच्या वतीने पुणे जिल्हयातील  16 ताडी विक्रेत्यांची तपासणी करून नमुने ताब्यात घेतले . त्यानंतर हे नमुने मुंबई येथील  हाफकीन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत जिल्ह्यातील 12 ताडी  विक्रेत्यांच्या ताडी नमुन्यामध्ये क्लोरल हायड्रेट (CH) मिसळून भेसळ केल्याचे सिध्द झालेले आहे.त्यानंतर जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी संबंधित 12 ताडी विक्रेत्यांकडून महाराष्ट्र ताड़ी (अनुज्ञप्ती) देणे व ताडी छेदणे नियम, 1968 मधील नियम, 18, 20(ब) (ड),24, 29 व ट.ड.। अनुज्ञप्ती क्र.5 व 7 चे उल्लंघन केले असून, ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट हा पदार्थ मिसळून भेसळ करतात. त्यामुळे भेसळयुक्त ताडी सेवनाने मानवो प्रकृतीवर घातक परिणाम होतो ही बाब स्पष्ट होत असल्याने जनहितार्थ सदर अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करुन अनुज्ञप्तीधारका विरुध्द नियमानुसार गुन्हा नोंद करुन फौजदारी कारवाई होणे आवश्यक असल्याचे आदेश देशमुख यांनी दिले. --- या बारा ताडी विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द व फौजदारी गुन्हे दाखल -  1) अशोक साहेबराव भंडारी, ताडी दुकान कळंब वालचंदनगर, 2) चंद्रकांत हनुमंत शिंदे, इंदापूर, 3) बसबराज बालाप्पा भंडारी, मुळशी, 4) सुरेश मिमराब भंडारी, दौंड, 5)  लक्ष्मीनारायण फकिरय्या गौड, इंदापूर,6) अविनाश प्रल्हाद भंडारी, पुरंदर, 7) विजय गोपीनाथ भंडारी, इंदापूर, 8) निलम साया गौड,मावळ,9) अमृत माणिक भंडारी,आंबेगाव, 10) व्यकंटेश दस्तय्या कलाल, मुळशी11) चंद्रकांत हनुमंत शिंदे, इंदापूर 12) राजशेखर अनंतराम गौड,  इंदापूर

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारी