शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'एल्गार परिषदेवर कायमची बंदी घाला, अन्यथा परिषद झाल्यास आम्ही उधळून लावू'; भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 18:23 IST

एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

- नेहा सराफ 

पुण्यात नुकतीच पार पडलेली एल्गार परिषद पुन्हा एकदा वादात सापडली आहे. एल्गार परिषदेच्या भाषणात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचा माजी विद्यार्थी नेता शरजिल उस्मानीवर गुन्हा  दाखल झालेला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता भाजपने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आता गुन्हा दाखल झाल्यावरही भाजपने या मुद्द्यावर आपली आक्रमकता कायम ठेवत एल्गार परिषदेवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

हिंदू धर्माबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत स्वारगेट पोलीस ठाण्यात शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी याकरिता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेटही घेतली होती. पण यापुढे एल्गार परिषदेच्या आयोजनावर बंदी घालावी अशी तसंच परिषद झाली तर आम्ही की उधळुन लावु अशी भुमिका आता भाजप युवा मोर्चाने केली आहे.  

भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी कालच पुण्याच्या पोलिस आयुक्तांना भेटलेले असताना आता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी पुन्हा त्यासाठीचे निवेदन विश्रामबाग , फरासखाना आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये दिले आहे.  यानंतर भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हणण्यात आले आहे की, ' संस्कृतीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याची शांतता भंग करणे , पुण्यामध्ये धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण करु पाहणाऱ्या एल्गार  परिषदेचा खरा चेहरा शरजिल उस्मानीच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. एल्गार परिषदेवर बंदी घालावी आणि भविष्यात पुणे शहरा मध्ये एल्गार परिषदेला कार्यक्रमाला परवानगी देऊ नये'.

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाMaharashtraमहाराष्ट्र