शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

चुरस वाढूनही शिरूरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 13:16 IST

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील व प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होत असल्याने दिल्याने चुरस निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे५८.४ टक्के मतदान : गेल्या वेळीपेक्षा १ टक्यांची घट

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव- पाटील यांना राष्ट्रवादी प्रसिध्द अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र, तरीही मतदानाचा टक्का काहीसा घसरलाच आहे. गेल्या वर्षीपेक्षा एक टक्का घटून ५८.४ टक्के मतदान झाले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात आढळराव- पाटील आणि डॉ. कोल्हे यांची थेट लढत होत आहे. विजयी चौकार मारण्यासाठी आढळराव- पाटील यांनी जय्यत तयारी केली होती. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेले आणि शिवसेनेचे संपर्क नेते असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने त्यांना आव्हान दिले. त्याचबरोबर सहाही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील सुभेदारही सक्रीय झाले होते. आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि बड्या नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, त्याचे प्रत्यंतर मतदानात उमटलेले दिसले नाही . आंबेगाव  विधानसभा मतदारसंघ  खासदार शिवाजीराव आढळराव यांचा घरचा मतदारसंघ.  त्यांच्यातील माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्यातील संघर्षाचे मैदान असलेल्या आंबेगाव तालुक्यात सुमारे ६१ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत येथे ७२.०८ टक्के मतदान झाले हेते.  तब्बल १२ टक्के मतदान घटले आहे.  डॉ. अमोल कोल्हे यांचा घरचा मतदारसंघ असलेल्या जुन्नरमध्येही हिच परिस्थिती आहे. येथे गेल्या निवडणुकीत ६७.५७ टक्के मतदान झाले होते.  यंदाही ६७ टक्यांच्या आसपास मतदान झाले आहे.  खेड- आळंदी मतदारसंघात ५९ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी येथे ६४.८९ टक्के मतदान झाले होते. शिरूरमध्येही गेल्या वेळीइतकेच सुमारे ६० टक्के मतदान झाले आहे. भोसरी आणि हडपसर या शहरी विधानसभा मतदारसंघात ५४ टक्यांच्या आसपास मतदान झाले आहे. गेल्या वेळी भोसरीमध्ये ५२.७३ आणि हडपसरमध्ये ४८.५२ टक्के मतदान झाले होते. 

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे