शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यमंत्र्यांसमोरच लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा; टोपे यांनी प्रशासनाला धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 15:50 IST

बहुतेक सर्वच लोक प्रतिनिधींच्या हाॅस्पिटलच्या मनमानी व अधिकच्या बिलासंदर्भात तक्रारी व तीव्र भावना आहेत।

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजच्या कोरोना आढावा बैठकीत लोकप्रतिनिधीनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांच्या समोर तक्रारींचा पाढाच वाचला. खुद्द खासदार वंदना चव्हाण यांनी देखील शहरात महापालिका प्रशासनाकडून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत केले जात नाही. लोकप्रतिनिधींनी वारंवार सांगून देखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले, प्रत्येक बैठकीत अनेक निर्णय घेतले जातात. पण पुढे काय होते ते काहीच कळत नाही. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टोपे यांनी शुक्रवारच्या कोरोना आढावा बैठकीत कोणते निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी या संदर्भातील माहिती लोकप्रतिनिधींना दर गुरूवारी घरपोच झाली पाहिजे अशी सूचना प्रशासनाला दिली. 

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत आहे. टोपे म्हणाले, कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिले आकारणाऱ्या रुग्णालयांना फक्त नोटीसा देऊन काही होणार नाही.आपत्ती कायदा व अन्य सर्व कायद्याचा आधार घेऊन कारवाई करा म्हणजे हाॅस्पिटल जागेवर येतीलरोज लक्ष दिले तर अडचण येत नाही. दररोज बिलांची तपासणी केली तर जरब देखील बसेल. फक्त नोटीसा देऊन काही होणार नाही.आपत्ती कायदा व अन्य सर्व कायद्याचा आधार घेऊन कारवाई करा म्हणजे हाॅस्पिटल जागेवर येतील.

तसेच सहकार विभाग, जिल्हा परिषदेचे ऑडिटर सध्या काही काम नसल्याने बसून आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक हाॅस्पिटल प्रत्येक बिल चेक करा. रँडम तपासणी न करता बिल तपासणी सिस्टमचा भाग झाला पाहिजे. बिल कमी झाले हे खरे पण जास्त बिल लावलेल्या हाॅस्पिटलवर काय कारवाई करण्यात आली यावर लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाने निश्चित केलेले दर देखील खुपच रास्त आहेत. त्यानंतर देखील रुग्णालये जास्त बिल घेत असतील तर ही गंभीर बाब आहे.  शहरातील सर्व खासगी व मोठ्या हाॅस्पिटलची शंभर टक्के बिल चेक करा म्हणजे वास्तव समोर येईल. 

किती लोक नियुक्त केले ऑडिटसाठी... बहुतेक सर्व आमदाराच्या हाॅस्पिटलच्या मनमानी व अधिकच्या बिला संदर्भात तक्रारी व तीव्र भावना आहेत. प्रशासन कारवाईबाबत टाळाटाळ करतंय का? एखाद्या हाॅस्पिटलबाबत काही तक्रार असेल तर थेट माझ्याकडे लेखी तक्रार करा. मी स्वत : यंत्रणेमार्फत तपासणी करून दोषी हाॅस्पिटलवर कारवाई करेल असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेRajesh Topeराजेश टोपेcorona virusकोरोना वायरस बातम्याgirish bapatगिरीष बापटVandana Chavanवंदना चव्हाणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका