लोकप्रतिनिधींवर सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST2021-03-27T04:09:48+5:302021-03-27T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लग्न, दशक्रिया विधीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यावर मर्यादा घातली आहे. परंतु ...

लोकप्रतिनिधींवर सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लग्न, दशक्रिया विधीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यावर मर्यादा घातली आहे. परंतु आजही लग्नांसाठी ३००-५०० लोक उपस्थित राहतात. कोणतेही नियम पाळत नाहीत. अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. यामुळेच यापुढे लग्न, दशक्रिया विधी आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्यावर बंदी घातली आहे. एवढेच नाही भूमिपूजन, उद्घाटन आणि अन्य कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.
शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संपूर्ण राज्यात लग्नासाठी केवळ ५० व्यक्ती व दशक्रिया विधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घातली आहे. पुणे जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी स्वतंत्र लेखी आदेश काढले आहेत. सध्या जिल्ह्यात लग्नाचा हंगाम सुरू असून, शासनाने घातलेले निर्बंध कोणी पाळत नाही. लग्नासाठी आजही शेकडोंच्या पट्टीत लोक उपस्थित राहतात. यात लोकप्रतिनिधी देखील आघाडीवर असतात. बंदी असताना लोकप्रतिनिधी लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. त्यामुळे लोकप्रतिनिधीने लग्न, सार्वजनिक कार्यक्रम यांना उपस्थित राहू नये, अशा सक्त सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या. भूमिपूजन व उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधी गर्दी करत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्षात आणून दिले. यावर सर्व प्रकारचे भूमिपूजन, उद्घाटन व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.