शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: लोकहो ओमायक्रॉनला घाबरू नका; बरे झालेल्यांबरोबरच उपचार करणाऱ्यांचीही प्रकृती उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 16:12 IST

नागरिकांनी घाबरून न जाता पुरेसी काळजी घेणे आवश्यक आहे

पिंपरी : ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा तीनपट अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यातच शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे पिंपरीत अकरा रुग्ण आढळून आल्यामुळे भीतीचे वातावरण होते. महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालयात या रुग्णांवरती उपचार करण्यात आले होते. सद्यस्थितीत तरी ओमायक्रॉन रुग्णांमुळे या दोन्ही रुग्णालयांतील एकाही कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेसी काळजी घेणे आवश्यक आहे. जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला. हा विषाणू डेल्टा विषाणूपेक्षाही जास्त वेगाने पसरत असल्याची परदेशात दिसून आले आहे. शहरात परदेशातून आलेले तीन जण आणि त्यांच्या संपर्कातील तीन अशा सहा रुग्णांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचा अहवाल ५ डिसेंबरला आला होता. परिणामी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात आतापर्यंत ओमायक्रॉनचे  अकरा रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत  ओमायक्रॉन  विषाणूचा एकच सक्रिय रुग्ण आहे. तर दहा रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडले आहे. 

 १) शहरात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांना कोणताही लक्षणे नव्हती.  २) विशेष म्हणजे या रुग्णांना एक्सरे किंवा सिटीस्कॅन काढण्याची गरज लागलेली नाही.  ३) कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ज्या पद्धतीने उपचार दिले जातात, त्याच पद्धतीने उपचार 

''ओमायक्रॉनच्या रुग्णांना उपचार देताना रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काळजी घेऊनच उपचार केले आहे. कर्मचाऱ्यांनी पीपीई कीटचा वापर केला. या सर्व रुग्णांना कोणताही लक्षणे नव्हती. त्यामुळे दहा रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात ओमायक्रॉनचा एकच रुग्ण आहे. त्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे पिंपरी महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.''   

टॅग्स :PuneपुणेOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर