शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुणेकरांचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांना काढता पाय घ्यावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 16:06 IST

अरण्येश्वर , सहकारनगर, पर्वती, धायरी, वडगाव यांसारख्या भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्दे भाजप सरकार , पुणे महापालिका आणि पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा

पुणे : पुणे शहरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कात्रज तलाव साखळीतील तीनही तलावांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला. कात्रजपासून ते जनता वसाहतपर्यंतच्या संपूर्ण परिसरातील घरांना पुराच्या पाण्याने वेढले. या दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला तर काही अजूनही बेपत्ता आहेत. पूर सदृश परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आले. या पूरग्रस्त भागाची पाहणी व नुकसान झालेल्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी आलेल्या राज्याचे महसूल मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नागरिकांच्या तीव्र संतापाचा सामना करावा लागला.कार्यकर्त्यानी साखळी करून त्यांना नागरिकांच्या गर्दीतून बाहेर काढले.  

शहरातील अरण्येश्वर , सहकारनगर, पर्वती, धायरी, वडगाव यांसारख्या भागात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती.या दुर्घटनेत शहरात १४ बळी गेले असून काही जण बेपत्ता आहेत.गेल्या २ दिवसांपासून येथील नागरिक आपतकालीन संकटांशी संघर्ष करत आहे. पण पुणे महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षित मदत येथील पूरग्रस्त कुटुंबाना मिळालेली नाही. तसेच त्यांचे वीज प्रवाह आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाले. मदत न देता फक्त फोटो काढायला आल्याचा आरोप पुरग्रस्त नागरिकांनी केला. तसेच भाजप सरकार , पुणे महापालिका आणि पालकमंत्र्यांचा निषेध नोंदवणाऱ्या घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पाटील यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र ,नागरिकांनी कुठलाही प्रतिसाद न देता त्यांना विरोध केला.

या पुरात घर लोकांचे संसार उद्धवस्त झाले, अनेकांना कुटुंबातील व्यक्तींना गमवावे लागले. उपनगरातील सहकारनगर, सिंहगड रोड, वारजे, पार्वती  ते दहा फूट पाणी वाहत होते. यामध्ये ओढ्यासह अनेक सोसायट्यांच्या संरक्षक भिंती कोसळल्याने शेकडो वाहने वाहून गेले.  

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाchandrakant patilचंद्रकांत पाटील