शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

प्रलंबित खटले लागणार लवकरच निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:54 IST

तीन लोकन्यायालयात सिम्बॉयसिसच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एलएमएम, तीन व पाच वर्षांची पदवी घेत असलेले विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी लोकअदालतीच्या कामासाठी कोर्टस्टाफची मदत केली.

ठळक मुद्देसिम्बॉयसिसच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांने केले दाव्यांचे सुसुत्रीकरण पुरेसे पैसे मिळाले नसल्याचे दावे सर्वाधिक पुरेसे पैसे मिळाले नसल्याचे दावे सर्वाधिक

पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित येणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यासर्व कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र त्याचा योग्य मोबदला न मिळाल्याने तसेच विविध कारणांसाठी न्यायालयात दाखल झालेले जमीन अधिग्रहणाची ४ हजार ७७० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात आता पुरंदर येथे होणा-या विमानतळासाठी शेकडो एकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार असल्याने प्रलंबित खटल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोरगरीब शेतक-यांना त्यांच्या हक्काचे पैसे त्वरीत मिळावेत आणि न्यायालायचा वेळ वाचावा यासाठी न्यायालय आणि प्रशासन सरसावले आहे. येत्या २२ एप्रिल रोजी होणा-या लोक अदालतीमध्ये अधिकाधिक प्रकरणे ठेवून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी सिंम्बॉयसिस लॉ कॉलेजचे विद्यार्थी मोठे योगदान देत असून त्यांनी आत्तापर्यंत सुमारे दोन हजार ७८९ केसेसचे प्रकरणाप्रमाणे सुसुत्रीकरण केले आहे. लॉ कॉलेजचे २० विद्यार्थी गेल्या डिसेंबरपासून काम करीत असून त्यांनी कायद्यातील कलमानुसार, वादीच्या मागणीनुसार किंवा विविध प्रकारानुसार कोर्टात दाखल असलेली प्रकरणे एकत्र केली आहेत. प्रकरणाची सर्वच माहिती एका ठिकाणी जमा झाल्याने आणि त्यात सुसुत्रता आल्याने लोक अदालतीमध्ये ही प्रकरणे निकाली काढणे सोपे होणार आहे. हक्काची जमीन प्रकल्पात गेल्याने जमीन मालक हैराण झाल्याचे दिसते. त्यांना दिलासा मिळावा, मोबदला म्हणून अपेक्षित रक्कम व प्रकल्पात न गेलेली जमीन परत मिळावी म्हणून विद्यार्थ्यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.     आत्तापर्यंत झालेल्या सुमारे तीन लोकन्यायालयात सिम्बॉयसिसच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एलएमएम, तीन व पाच वर्षांची पदवी घेत असलेले विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी लोकअदालतीच्या कामासाठी कोर्टस्टाफची मदत केली. तसेच प्रत्यक्ष लोकअदालतीच्या दिवशी देखील हे विद्यार्थी नागरिकांना मार्गदर्शन करीत होते. खटले लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी न्यायालय व प्रशासन सरसावले,  सिम्बॉयसिसच्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांने केले दाव्यांचे सुसुत्रीकरणया उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाज समजून घेता आले,अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक प्रा. शिरीष कुलकर्णी यांनी दिली. यासाठी लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशिकला गुरपुर यांनी मार्गदर्शन केले. तर पुणे जिल्हा विधी प्राधिकरणाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीराम मोडक आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रदीप अष्टुरकर यांच्यामुळे विद्यार्थ्यांना ही संधी मिळाली. या विद्यार्थ्यांना काम करता यावे, म्हणून अगदी रविवारी देखील न्यायालाचा स्टोर विभाग सुरू ठेवण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पुरेसे पैसे मिळाले नसल्याचे दावे सर्वाधिक :  प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये ७० टक्के प्रमाण हे निरा देवघर डॉम, आंध्रा खोरे, टेमघर, गुंजवणी आणि थिटेवाडी वॉटर टॅक या पाच प्रकल्प बाधितांचे आहेत. या दाव्यांमध्ये पुरेसे पैसे आले नसल्याचे प्रमाण सर्वाधिक आहेत. तर अनेक प्रकरणांचे पैसे देखील मंजूर झाले आहेत. मात्र ते पुरेसे नसल्याचा दावा केल्याने मंजुर झालेले पैसे न्यायालयात पडून आहे. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असून त्याच्या व्याजाची रक्कम देखील मोठी आहे. त्यामुळे ही प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यासाठी पुढील लोकअदालत महत्त्वाची ठरणार आहे.    प्रलंबित प्रकरणांची आकडेवारी शिवाजीनगर    १५१६स्मॉल कॉज    ८१७सिव्हील कोर्ट   ६५५बारामती        ३५७खेड            १४२५

एकूण           ४७७०

आम्ही आता केलेल्या या कामाचा प्रॅक्टिस करताना मोठा फायदा होणार आहे. याठिकाणी आम्हाला न्यायालयाचे कामकाज नेमके कसे चालते हे पाहता आले. पॅनल अटेंट करणे, न्यालालयातील सुनावणी ऐकण्यांची संधी आम्हाला मिळाली. हा खूप चांगला अनूभव होता. पूजा चव्हाण, उपक्रमाची समन्वयक

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयStudentविद्यार्थी