शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

पेन इंटरनॅशनल काँग्रेस आजपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 01:59 IST

हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे.

पुणे : हस्तकला प्रदर्शन, चिंतनात्मक व्याख्यान, स्मृतीस्थळांना भेट, काव्यवाचन, चर्चासत्र, नाटक अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली पेन इंटरनॅशनल काँग्रेसला आजपासून (२५ सप्टेंबर) पुण्यात सुरुवात होत आहे. भारतात पहिल्यांदाच हे अधिवेशन होत असून, पेनच्या ८७ केंद्रातील आणि ६० हून अधिक देशांतील लेखक पुण्यात दाखल झाले आहेत. दुपारी ३ वाजता आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा गांधी स्मृतीस्थळाला अभिवादन करुन या अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे.भारतीय लिपी आणि हस्तकला प्रदर्शन, महात्मा फुले स्मारकाला भेट, कला गजर प्रदर्शन, छायाचित्र प्रदर्शन, प्रसिद्ध चित्रकार गुलाम शेख यांचे व्याख्यान, हिंदी कवी अशोक वाजपेयी यांचे व्याख्यान, रामदास भटकळ लिखित ‘जगदंबा’ नाटकाचा इंग्रजी एकपात्री प्रयोग, विविध देशातील साहित्यिकांबरोबर चर्चा, केनियाचे विचारक एनगुगी वा थियॉन्ग यांचे चिंतनात्मक व्याख्यान, भारतीय भाषांतील कवी आणि मराठी कवी यांचे काव्यवाचन आदी कार्यक्रमांचा पेन इंटरनॅशनलमध्ये समावेश आहे. पुण्यातील शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, कुलगुरू, प्राध्यापक, प्रकाशक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने भारतात पेन इंटरनॅशनल काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. भारतामध्ये प्रथमच होत असलेल्या या अधिवेशनासाठी ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी पुढाकार घेतला आहे. जागतिक साहित्य व्यवहारावर या परिषदेच्य माध्यमातून प्रकाश टाकला जाणार असून, २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान पुण्यात ही परिषद होणार आहे.आगाखान पॅलेस येथे पुष्पांजली अर्पण करून सिम्बायोसिसच्या विमाननगर येथील कॅम्पसमध्ये दुपारी चार वाजता उद्घाटन सोहळा रंगणार आहे. पेन इंटरनॅशनलच्या अध्यक्षा जेनिफर क्लेमेंट, ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर डॉ. देवी यांचे ‘व्हाय पेन, व्हाय पुणे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रामदास भटकळ लिखित ‘कस्तुरबा’ या मूळ नाटकाचा यशोधरा देशपांडे मैत्रा इंग्रजीतील प्रयोग सादर करणार आहेत. कवी, चित्रकार गुलाम मोहम्मद शेख यांच्या हस्ते बुधवारी (२६ सप्टेंबर) जवाहलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी साडेसहा वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर रिचिंग गांधी इन अवर टाइम्स या विषयावर त्यांचे व्याख्यानही होईल. गुरुवारी (२७ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्याापीठात भाषांचे लोकसर्वेक्षण या विषयावरील चर्चासत्रात कल्याणकुमार चक्रवर्ती, विजय कुमार, अरूण जाखडे, इंद्रनील आचार्य, लिसा लोमटाक, बलराम पांडे, शेखर पाठक, राजेश्वरी रामेश्वरय्या यांचा सहभाग आहे. दुपारी दोन वाजता होणाऱ्या दक्षिणायन चर्चासत्रात अरूणा साबणे, प्रमोद निगुडकर, प्रभा गणोरकर बोलणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांचे साहित्य आणि स्वातंत्र्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच यशोधरा देशपांडे मैत्रा जगदंबा नाटक सादर करणार आहेत.विद्याापीठात शुक्रवारी (२८ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता जागतिक भाषा वारी काढण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. न्गुंगी वा थिओन्गो यांचे डिकोलोनायझेशन आॅफ लँग्वेज रिलेशनशीप इन वर्ल्ड या विषयावर सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे व्याख्यान होणार असून, हलिना बिट्नेर, वसंत आबाजी डहाके यांच्यासह आंतरराष्ट्रीय कवींचा सहभाग असलेल्या कवी संमेलनाने शनिवारी संमेलनाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या