वाहनाच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:14 IST2020-12-05T04:14:44+5:302020-12-05T04:14:44+5:30
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावमधील डी. वाय. पाटील महाविद्याालय रस्त्यावर घडली. लक्ष्मी बालाजी ...

वाहनाच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू
पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लोहगावमधील डी. वाय. पाटील महाविद्याालय रस्त्यावर घडली.
लक्ष्मी बालाजी कांबळे (वय ३०,रा. निंबाळकरनगर, लोहगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक राम ठोंबरे यांनी यासंदर्भात विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरूवारी (३ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास कांबळे दूध आणण्यासाठी निघाल्या होत्या. डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्यावर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक ए. आर. गंधाले तपास करत आहेत.