रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:12 IST2021-05-18T04:12:09+5:302021-05-18T04:12:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चाकण : रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू ...

Pedestrian killed trying to cross the road | रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील पादचारी ठार

रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नातील पादचारी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

चाकण : रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. १६) रात्री ९ वाजता घडली.

बालाजी गोपाल वाघमारे (वय ५७, सध्या रा. जाधववाडा, प्राथमिक शाळेसमोर, चाकण, मूळ रा. खारोळा, ता. रेणापूर, जि. लातूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा संतोष बालाजी वाघमारे (वय २५, रा. आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली.

बालाजी हे रविवारी रात्री ९ च्या दरम्यान पुणे -नाशिक महामार्गावरून पायी जात होते. नाणेकरवाडी हद्दीतील कमानी जवळून ते रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होते. त्या वेळी पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे भरधाव जाणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे व पोलीस हवालदार उद्धव गर्जे यांनी दिली.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर बामणे, सहायक फौजदार शेषराव वाघुले, पोलीस हवालदार उद्धव गर्जे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed trying to cross the road