शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कडाचीवाडी येथे मोर व लांडोराची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:51 IST

शेती व जंगल परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. 

ठळक मुद्देरात्रीच्यावेळी जाळे लावून शिकार करण्यात आली असल्याचा संशय

चाकण : कडाचीवाडी ( ता.खेड ) परिसरात सुकल्या डोंगरावर मंगळवारी  ( दि.१५ ) मोर व लांडोराची शिकार करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना सकाळच्या प्रहरी फिरण्यासाठी जाणारे माजी उपसरपंच बाळासाहेब कड व अशोक काशिनाथ कड, अनिता झिंजुरके यांनी निदर्शनास आणून दिली.  सुकल्या डोंगरावर शेती व जंगलचा परिसर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर मोरांची संख्या आहे. रात्रीच्यावेळी जाळे लावून शिकार करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोरांची उपटलेली पिसे व इतर मांस याठिकाणी पडले होते. सकाळच्या वेळी डोंगरावर फिरायला जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच या डोंगरावर काही सागाची झाडेही तोडण्यात आल्याचे आढळले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आदिती कोदे व वनपाल प्रदीप कासारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अशा प्रकारच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या प्राण्यांची शिकार होणे, ही बाब अतिशय गंभीर असून वनविभागाने याबाबत उपाययोजना करण्याची व शिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे माजी उपसरपंच बाळासाहेब कड यांनी सांगितले. 

टॅग्स :KhedखेडCrimeगुन्हाforestजंगल