अजित वडगावकर यांना शांतिदूत सेवारत्न पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:34+5:302021-02-05T05:08:34+5:30
शांतिदूत परिवार संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात आयएएस अधिकारी शाम देशपांडे, माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. ...

अजित वडगावकर यांना शांतिदूत सेवारत्न पुरस्कार
शांतिदूत परिवार संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात आयएएस अधिकारी शाम देशपांडे, माजी पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, विद्या जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत डीआयजी अधिकारी राजेंद्र डहाळे व सायबर क्राईमच्या डीसीपी अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या हस्ते वडगावकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी साखर आयुक्त शेखर गायकवाड, सेवा निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप, डॉ. शशांक शाह, डॉ. पूनम शाह, डॉ. परिन सोमानी, डॉ. दत्ता कोहिनकर, रामदास जैध, जगन्नाथ जाधव, रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील आदिंसह आळंदीतील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
२९आळंदी
आळंदीतील अजित वडगावकर यांना शांतिदूत सेवारत्न पुरस्कार प्रदान करताना मान्यवर.