पीडीएफए, कोल्हापूर अंतिम लढत
By Admin | Updated: May 9, 2017 04:01 IST2017-05-09T04:01:54+5:302017-05-09T04:01:54+5:30
सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस (सीएपीएफ) आयोजित पंतप्रधान करंडक फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे जिल्हा फुटबॉल संघटना

पीडीएफए, कोल्हापूर अंतिम लढत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस (सीएपीएफ) आयोजित पंतप्रधान करंडक फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) संघाने नागपूर संघाचा २-० गोलने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे मुलींच्या गटात पीडीएफए संघाने मुंबईच्या फुटबॉल लिडर अकादमी संघाचा ११-० गोलने धुव्वा उडवत आगेकूच केली.
मुंबई येथील जे. एन. पेटिट स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात आल्फ्रेड नेगल व एडविन फलेरो यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर पुणे जिल्हा फुटबॉल संघटना (पीडीएफए) संघाने नागपूर संघाचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. पीडीएफए संघाचा अंतिम फेरीचा सामना मंगळवारी (दि. ९) कोल्हापूर संघाशी होणार आहे.
मुलींच्या गटात स्म्रिती गिरीशच्या (१८,२३,५५ मि. हॅट्ट्रिक) उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पीडीएफए संघाने फुटबॉल
लिडर अकादमी संघाचा ११-० गोलने
पराभव केला. विजयी संघाकडून
ऐश्वर्या जगताप (१३, ४७ मि.) व प्रिया
सातव (२०, ४३ मि.) यांनी प्रत्येकी दोन गोल, तर सोनाली चेमट, गौतमी शिंदे, ऐश्वर्या गाडेकर, स्मिधी खोकळे यांनी प्रत्येकी एक
गोल केला.