शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election | आरक्षण सोडतीवर २७३ हरकती; 'या' प्रभागांवर सर्वाधिक आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:34 IST

सहा प्रभागातील आरक्षण सोडत, प्रभागाची व्याप्तीबाबत आक्षेप...

पिंपरी : महापालिका निवडणूकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. सहा प्रभागातील आरक्षण सोडत, प्रभागाची व्याप्तीबाबत आक्षेप नोंदविले आहेत. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता आरक्षित जागांच्या सोडतीनंतर २७३ हरकती निवडणूक विभागाकडे आल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक चिखली आणि च-होली मधील आरक्षणावर २६९ हरकती आल्या आहेत. एकाच व्यक्तीने गठ्ठ्याने त्या हरकती दिल्या आहेत.

एकूण पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मागील महिन्यात ओबीसी आरक्षणाविना महिलांसाठीची आरक्षण सोडत काढली. पिंपरी महापालिकेत १३९ जागा असून यामध्ये ७० महिला आणि ६९ पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी (एससी) २२ जागा राखीव आहेत. त्यात महिलांसाठी १९, ४१, २०, १८, ३७, ४३, ३४, २४, ३५, ११, १४ अशा ११ महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर, २, १६, १७, १८, २२, २५, २९, ३२, ३७, ३८, ३९, ४४, ४६ या ११ जागा एससी पुरुष, महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  ४४,४१ राखीव झाली आहे. तर, प्रभाग ६ मधून एसटी समाजातील पुरुष, महिलेला लढता येईल.असे झाले आरक्षणसर्वसाधारण महिलांसाठी ५७ जागा आहेत. त्यातील ४५ जागा थेट पद्धतीने राखीव झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक ४६ मध्ये थेटपद्धतीने एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केली. त्यामुळे १२ प्रभागासाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण महिलेसाठी ४०, १२, ३६, ७,२१, १३,१,४२, ८,३१, २७, ३० हे प्रभाग राखीव झाले. तर उर्वरित प्रभाग हे पुरूषांसाठी राखीव झाले आहेत.  अनुसुचित जातीबाबत आक्षेपप्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत ६ जूनपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. या मुदतीत आरक्षण सोडतीवर हरकती आल्या आहेत. प्रभाग क्रमांक २ चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडीतील एससीच्या आरक्षणावर आणि प्रभाग क्रमांक ५ चºहोली-चोविसावाडी-वडमुखवाडीतील एसटी आरक्षणा बदलावर सर्वाधिक हरकती आहेत. या दोन प्रभागाबाबत २६९ हरकती एकाच व्यक्तीने दिल्या आहेत. हरकती एकसारख्याच आहेत.  हरकतींचा केवळ सोपस्कारप्रभाग क्रमांक ३४, ३५, ४३, ११ याबाबत देखील हरकती आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी देखील घेतली जाणार नाही. त्यामुळे हरकतींचा काही उपयोग होण्याची शक्यता नाही. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण १३ जून रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक