शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालयातल्या पार्किंग बंदची वर्षपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 20:40 IST

दोन मजल्यांचे पार्किंग बंद असल्याने वकील, पक्षकारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील, पक्षकार जिल्हा न्यायालयात गाडी लावत आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षी १२ आॅगस्टला या इमारतीचे उद्घाटन, निर्णय न झाल्याने कोंडी कायमशुल्क द्यावे लागल्यास वकील आणि पक्षकारांना आर्थिक फटका बसणार कौटुंबिक न्यायालयात पे अँड पार्क केल्याने तिकडची वाहने देखील जिल्हा न्यायालयात पार्क

पुणे : पार्किंगसाठी पैसे ठेवायचे की ते सर्वांसाठी विनामुल्य खुले करायचे यावर अनेकदा चर्चा आणि बैठका झाल्यानंतरही स्थलांतर झालेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नवीन इमारतीतील पार्किंग एक वर्ष उलटल्यानंतरही बंद आहे. गेल्या वर्षी १२ आॅगस्टला या इमारतीचे उद्घाटन झाले होते. तेव्हापासून न्यायाधीश व कर्मचारी वगळता सर्वांसाठी येथील दोन मजली पार्किंग बंद आहे. न्यायालयाची सुरक्षा लक्षात घेता आणि तसेच पार्किंगमधून मिळणा-या रक्कमेतून येथील विकास कामांकरीत पे अँड पार्क करण्याची भूमिका दी पुणे फॅमिली कॉर्ट लॉयर्स असोसिसएशनने (एफसीएलए) सुरुवातीला घेतली. त्याबाबत उच्च न्यायालायत पत्रव्यवहार करण्यात आले होते. त्यानंतर या प्रश्नी अनेकदा बैठका झाल्या. मात्र अद्याप पार्किंग पे अँड पार्क असणार की मोफत याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. राज्यात इतरत्र कोणत्याही न्यायालयात पार्किंगसाठी पैसे मोजावे लागत नाही. शुल्क द्यावे लागल्यास वकील आणि पक्षकारांना आर्थिक फटका बसणार आहे. तसेच पैसे देण्यावरून वाद होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे पे अँड पार्कला फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्हॉकेट असोसिएशनने (एफसीएए) विरोध दर्शवला आहे. उद्घाटन होऊन एक वर्ष उलटले तरी अद्याप पार्किंग सुरू न झाल्याने जिल्हा न्यायालयात असलेली कोंडी कायम आहे. पार्किंगबाबत वकिलांचा नाराजी लक्षात घेता भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर येथील पार्किंग सुरू करण्यात येणार होते. मात्र, त्या गोष्टीला देखील आता सहा महिने उलटले आहे. दोन मजल्यांचे पार्किंग बंद असल्याने वकील, पक्षकारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील, पक्षकार जिल्हा न्यायालयात गाडी लावत आहे. त्यामुळे तेथे वाहनांची गर्दी वाढत आहे. मुळात जिल्हा न्यायालयातच पार्किंगची जागा अपुरी आहे. त्यात कौटुंबिक न्यायालयात येणारी वाहने देखील त्याठिकाणी पार्क करण्यात येत असल्याने मिळेत त्या ठिकाणी वाहने लावण्यात येत आहेत.     कौटुंबिक न्यायालयात पे अँड पार्क केल्याने तिकडची वाहने देखील जिल्हा न्यायालयात पार्क करण्यात येतील. त्यामुळे कोंडी कमी करण्याचा उद्देश पे अँड पार्कमधून काहीही साध्य होणार नाही, असे मत काही वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केले. 

उच्च न्यायालयच पे अँड पार्क बाबत आग्रह सर्वांना मोफत पार्किंग द्यावे अशी आमची इच्छा आहे. किमान वकिलांना शुल्क  नसावे, अशी मागणी आहे. मात्र सुरक्षा आणि देखभाल कोण करणार या मुद्यावर उच्च न्यायालय पे अँड पार्कसाठी आग्रही आहे. त्यामुळे न्यायालय आदेश देईल, त्यापद्धतीने लवकरच पार्किंग सुरू करण्यात येईल. वैशाली चांदणे, अध्यक्षा दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स एसोसिएशन. 

पार्किंगबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश नाही पार्किंग कधी आणि कशा पद्धतीने खुले करण्यात येणार, याबाबत उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाही. त्यामुळे सध्या पार्किंगमध्ये सुरू असलेल्या पट्टे मारण्याच्या कामाचा आणि न्यायालयाच्या आदेशाचा काही संबंध नाही. पार्कींग सर्वांना मोफत खुले करण्याची आमची भूमिका कायम आहे. ही मागणी पुर्ण न झाल्यास १५ आॅगस्टपासून संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. अँड. नियंता शहा, अध्यक्ष, फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्हॉकेट असोसिएशन (एफसीएए) 

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCourtन्यायालयParkingपार्किंग