वापरा आणि फेका ही पवार यांची नीती

By Admin | Updated: March 14, 2015 23:35 IST2015-03-14T23:35:35+5:302015-03-14T23:35:35+5:30

वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. मागील वीस वर्षांपासून काकडे घराण्याला हाताशी धरून पवारांनी केवळ सत्तेची पोळी भाजली.

Pawar's strategy to use and throw | वापरा आणि फेका ही पवार यांची नीती

वापरा आणि फेका ही पवार यांची नीती

सोमेश्वरनगर : वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. मागील वीस वर्षांपासून काकडे घराण्याला हाताशी धरून पवारांनी केवळ सत्तेची पोळी भाजली. राज्यातील सर्वाधिक घोटाळेबाज नेता कोण हे महाराष्ट्राला ठाऊक आहे़ सोमेश्वरच्या आर्थिक डबघाईला अजित पवार देखील जबाबदार आहेत, असा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक शहाजी काकडे यांनी केला. काकडे कुटूंबातील मोठ्या नेत्याने पवारांच्या विरोधात बंड केल्याने तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. ६) होळ (ता. बारामती) येथे झालेल्या सभेत कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे व राजवर्धन शिंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे बडे नेते असलेले शहाजी काकडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार व अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केला.
सोमेश्वर सोसायटीत २२ कोटी रूपयांचा घोटाळा झाला, असे पवार यांचे म्हणणे आहे. मात्र मी सोमेश्वर कारखान्याचा अध्यक्ष असताना माझ्या बंधुंनी चुकीच्या तारणावर कर्ज उचलले. मात्र, ज्या बँकेने हे २२ कोटी कर्ज मंजूर केले. ती बँक आज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. त्यामुळे तुम्ही पण या घोटाळ््याला कारणीभूत आहात. पवार म्हणतात सोमेश्वर सर्वसेवा संघात ३ कोटी २२ लाखाचा गैरव्यहार झाला. ६ महिन्यापूर्वी पुणे येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये झालेला खर्च कारखाना कामासाठी झाला आहे, असे खर्च करावे लागतात. याबाबत पवार यांनीच स्पष्ट कबुली संचालक मंडळासमोर दिली होती. आज मात्र पवार पुन्हा एकदा राजकीय पोळी भाजण्यासाठी माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. सोमेश्वर ने आतापर्यंत विविध प्रकल्प उभारले आहेत. यासाठी कोट्यावधी रूपयांची कर्जे मंजूर करावी लागली आहेत. हे सर्व शरद पवार यांच्या मदतीमुळे घडले. तर शरद पवार यांचे सर्वाधिक प्रेम असलेल्या माळेगाव कारखान्याला त्यांची मदत का नाही झाली, असा टोला त्यांनी लगावला. अध्यक्षपदाच्या काळात सोमश्वरच्या सभासदांचा करोडो रूपये फायदा करून दिला आहे. काकडे कुटुबियांनी हा कारखाना उभारल्यामुळे हे सर्व मी कारखान्यासाठी केले, असे काकडे म्हणाले. (वार्ताहर)

पारंपरिक विरोधक म्हणून पवारांनी केवळ माझा वापर करून घेतला. नंतर माझा सूडबुद्धीने बळी देणे मी समजू शकतो, मात्र सदैव पवार यांच्याशी प्रामाणिक राहणारे राजवर्धन शिंदे यांचा जाहीरपणे पाणउतारा करणे, म्हणजे वापरा आणि फेका ही पवारांची नीती आहे. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात जो काही उसाला दर दिला तो अजित पवारांनाच विचारून दिला. मात्र माझी जनमानसात प्रतिमा मलीन करण्यासाठी आज माझ्यावर अजित पवार खोटेनाटे आरोप करीत आहेत. वास्तविक राज्यातील सर्वाधिक घोटाळेबाज कोण आहे, हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी गावागावांत, घरांघरात भांडणे लावून राजकीय पोळी भाजून घेत ‘फोडा आणि झोडा’ ही नीती पवारांनी नेहमीच वापरली आहे.
- शहाजी काकडे,
संचालक, सोमेश्वर कारखाना

 

Web Title: Pawar's strategy to use and throw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.