कारमधून पावणेदोन लाख लंपास

By Admin | Updated: May 12, 2017 05:28 IST2017-05-12T05:28:43+5:302017-05-12T05:28:43+5:30

मंगल कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या कारची काच फोडून त्यातून १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली.

Pavanadon lakh lumpas from the car | कारमधून पावणेदोन लाख लंपास

कारमधून पावणेदोन लाख लंपास

पुणे : मंगल कार्यालयाच्या आवारात पार्क केलेल्या कारची काच फोडून त्यातून १ लाख ७५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोर घडली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ वसवे (वय ३९, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे वसवे यांच्या ओळखीचे लग्न होते. मंगळवारी सायंकाळी ७ ते रात्री ९ दरम्यान ते तिथे गेले होते. त्यांनी जाताना त्रिमूर्ती मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर कार पार्क केली होती. यादरम्यान चालकाच्या मागच्या सीटची काच फोडून कारमधील पर्ससह १ लाख ७५ हजार रुपये आरोपीने लंपास केले. पुढील तपास सहायक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

Web Title: Pavanadon lakh lumpas from the car